▪️बनावट कागदपत्रे सादर करून प्रपत्र प्राप्त केल्यामुळे 32 व्यक्तींवर गुन्हे दाखल
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि.21 जुलै : चंद्रपूर, महाऔष्णिक विद्युत केंद्रात प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी नोकरभरतीत गैरव्यवहार प्रकरणी आक्षेप/ तक्रार असलेल्या 128 प्रकरणात विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांच्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे 128 व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रपत्र वितरीत झाले. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी पथक नेमण्यात आले होते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) व त्यांच्या चौकशी पथकाने चंद्रपूर, महाऔष्णिक विद्युत केंद्रात भरती आक्षेप असलेल्या 128 प्रकल्पग्रस्तांची चौकशी करण्यात आली. सदर पथकाने उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, चिमूर व गोंडपिपरी येथील मूळ भूसंपादनाचे रेकॉर्ड व अर्जदारांनी संलग्न केलेल्या दस्तऐवजाची तपासणी केली. त्यामध्ये 32 प्रकल्पग्रस्तांनी खोट्या दस्तऐवजानुसार चंद्रपूर उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), कार्यालयातून प्रपत्र प्राप्त करून घेतलेले आढळून आले.
त्यांच्या चौकशी अहवालाची प्रत शासनास व चंद्रपूर, महाऔष्णिक विद्युत केंद्रास सादर करण्यात आली असून 32 प्रकल्पग्रस्त नामनिर्देशित व्यक्ती विरोधात बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची व चंद्रपूर, महाऔष्णिक विद्युत केंद्राची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत एकूण 128 प्रकल्पग्रस्तांतर्फे नामनिर्देशित व्यक्तीपैकी पात्र 56 व अपात्र 72 व्यक्ती निष्पन्न झाले आहे. सदर अपात्र 72 प्रमाणपत्र रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
72 अपात्र व्यक्तींपैकी 32 नामनिर्देशित व्यक्तींनी बनावट कागदपत्रे सादर करून प्रपत्र प्राप्त केल्यामुळे त्यांच्या विरोधात रामनगर पोलीस स्टेशन,चंद्रपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जताळे यांनी कळविले आहे.
In Mahaaushnika Vidyut Kendra project-affected trainee recruitment case, 32 persons have been booked for obtaining the form by submitting fake documents.