तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात, महसूल विभागात उडाली खळबळ, 12 हजारांची स्विकारली लाच Talathi Adkala ACB Uproar in revenue department Acceptable Latch of 12 thousand

▪️तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात

▪️महसूल विभागात उडाली खळबळ 

▪️12 हजारांची स्विकारली लाच   

गडचिरोली 14 ऑगस्ट : मुरुमाची ट्रॅक्टर पकडून पंचनामा करुन सोडून दिल्याचा मोबदला म्हणून 15 हजार रुपयांची मागणी करून 12 हजार रुपये स्वतःच्या कक्षात स्वीकारल्या प्रकरणी लाप्रवी (ACB) गडचिरोली पथकाने तलाठी साझा क्रमांक 15, वडधा मंडळ कार्यालय देऊळगाव ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील तलाठी रमेश महागु कवडो (32) यास रंगेहाथ पकडले. सदर कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदाराच्या मालकीचे ट्रॅक्टरने त्यांचे वाहन चालक डार्ली येथील खदाणीतन मरुमाची चालक डार्ली येथील खदाणीतून मुरुमाची वाहतूक करत असतांना तलाठी रमेश महागु कवडो यांनी ट्रॅक्टर पकडून पंचनामा करुन सोडून दिल्याचा मोबदला म्हणून 15 हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली. दरम्यान पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, ला.प्र.वि. गडचिरोली यांचे पर्यवेक्षणात पो. नि. शिवाजी राठोड यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना मुरुमाची वाहतूक करीत असलेले ट्रॅक्टर पकडून त्याचा पंचनामा तयार करुन कोणतीही कार्यवाही न करता सोडून देण्याचा मोबदला म्हणून 15 हजार रुपये लाच रक्क्मेची पंचसाक्षीदारांसमक्ष मागणी केली व तडजोडीअंती 12 हजार रुपये लाच रक्कम स्वतःच्या कक्षात तलाठी रमेश महागु कवडो हे स्विकारंताता रंगेहाथ मिळून आले. यावरुन आरोपी तलाठी कवडो विरुध्द पोलीस स्टेशन आरमोरी येथे गुन्हा दाखल करण्यात येत असून ताडुरवार नगर, आरमोरी येथील भाडयाचे खोलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली चमुकडून झडती घेण्यात आलेली आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र. वि. नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर व कु. अनामिका मिर्झापूरे, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांचे पर्यवेक्षणात पो. नि. शिवाजी राठोड, पोहवा नथ्थु धोटे, पोना स्वप्निल बांबोळे, पोशि किशोर ठाकुर, संदीप उडान, संदिप घोरमोडे, चापोना प्रफुल डोर्लीकर सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.

▪️Talathi Adkala ACB 

 ▪️ Uproar in revenue department

 ▪️ Acceptable Latch of 12 thousand

 Gadchiroli August 14: Lapravi (ACB) after catching Murumachi tractor and accepting Rs.12000 By demanding Rs.15,000 was accepted in the case of Lapravi (ACB), Gadchiroli Road, Talathi, Shared No. 15, Waddha Mandal Office, Deulgaon Ta.  Armory Dist.  Talathi Ramesh Mahagu Kavdo (32) of Gadchiroli was caught red-handed.  The Sadar action has created a stir in the revenue department.  The tractor owned by the complainant demanded Rs 15,000 as a compensation for the driver of the vehicle, Darli, from a mine at Marumachi, where he was transporting the driver from a mine at Darli, to Murumachi.  Not wanting to pay lakhs of rupees to the complainant, he lodged a complaint with the officers of the Prevention of Bribery Department, Gadchiroli.  Meanwhile, Police Inspector Shridhar Bhosle, L.P.V.  Gadchiroli under the supervision of Po.  Prohibit.  Shivaji Rathod had organized the whole action by verifying the complaint given by the complainant very confidentially, in which, during the investigation, he caught the tractor transporting the complainant to Murumachi, prepared a panchnama for it, and did not take any action, demanded Rs 15,000 lakhs in front of the five witnesses as a compensation and added another Rs 12,000.  Rupees lakh amount in his own class, Talathi Ramesh Mahagu Kavdo he accepted red handed.  Yavrun accused Talathi Kavdo has been registered a crime at Police Station Armory and a search has been taken from Lachluchpat Prohibition Department Gadchiroli Chamukdu in a rented room at Tadurwar Nagar, Armory.
Sadarchi Action Superintendent of Police Rahul Maknikar, Anti Corruption Bureau, Nagpur, Sachin Kadam, Additional Superintendent of Police, L.P.  V. Nagpur, Sanjay Purandare, Additional Superintendent of Police, La.  Q. V. Nagpur and Ms.  Anamika Mirzapure, L.P.V.  Nagpur's guidance and police inspector Shridhar Bhosale's supervision.  Prohibit.  Shivaji Rathod, Pohwa Natthu Dhote, Pona Swapnil Bambole, Poshi Kishore Thakur, Sandeep Udan, Sandeep Ghormode, Chapona Praful Dorlikar are all from the Anti-Corruption Department, Gadchiroli.