चंद्रपूर जिल्हा पोलिसांची धडक कारवाई, गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक Chandrapur District Police Strike Action, Illegal Traffic of Bovine Animals

चंद्रपूर जिल्हा पोलिसांची धडक कारवाई

गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या विरुद्ध 18 ऑगस्टला जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक मोहीम राबवित 71 गोवंशीय जनावरे, 8 चारचाकी वाहने व 14 आरोपीना अटक करीत एकूण 19 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पोलीस स्टेशन शेगाव हद्दीतील वरोरा-चिमूर मार्गावर पोलिसांनी नाकेबंदी करीत 26 गोवंशिय जनावरे, 2 वाहने व आरोपी 18 वर्षीय बिलाल जाकीर कुरेशी, 28 वर्षीय अब्दुल नाजीम अब्दुल कुरेशी, 23 वर्षीय रितीक सावंत मेश्राम, 55 वर्षीय राजेंद्र भाऊराव सोयाम व 26 वर्षीय नेहाल राजेंद्र सोयाम यांना अटक करण्यात आली.
पोलीस स्टेशन कोठारी हद्दीत देवई फाटा रोडवर नाकेबंदी करीत पोलिसांनी संशयास्पद रित्या आलेल्या वाहनांची झडती घेत त्यामधील एकूण 8 गोवंशीय जनावरे कत्तली साठी नेत असताना वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले.

पोलीस स्टेशन पोम्भूर्णा हद्दीतील चिंतळधाबा केमारा मार्गावर पोलिसांनी कारवाई करीत 3 वाहनांमधून तब्बल 27 गोवंशीय जनावरे ताब्यात घेत आरोपीना अटक करण्यात आली.

गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विठ्ठलवाडा ते भंगाराम तळोधी मार्गावर नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला थांबविले असता त्यामधील 10 गोवंशीय जनावरे जप्त करीत 6 आरोपीना अटक करण्यात आली.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव चे ठाणेदार अविनाश मेश्राम, पोम्भूर्णा चे ठाणेदार मनोज गदादे, कोठारी ठाणेदार विकास गायकवाड, गोंडपिपरी चे ठाणेदार जीवन राजगुरू, पोउपनी महेश सुरजूसे, पोलीस कर्मचारी भीमराव पडोळे, मदन येरने, गणेश मेश्राम, निखिल कौरासे, संतोष निषाद, प्रफुल कांबळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

Chandrapur District Police Strike Action, Illegal Traffic of Bovine Animals