गणेशोत्सव सौंदर्यीकरण पंधरवाडा, गणेशोत्सवानिमित्त अभिनव स्पर्धा, १ लक्ष प्रथम बक्षीस, चंद्रपुर महानगर पालिका चा उपक्रम Ganeshotsav beautification pandharwada, innovative competition on the occasion of Ganeshotsav, 1 lakh first prize, initiative of Chandrapur Mahanagar Palika

☀️ गणेशोत्सव सौंदर्यीकरण पंधरवाडा

☀️ गणेशोत्सवानिमित्त अभिनव स्पर्धा

☀️ १ लक्ष प्रथम बक्षीस
 
☀️ चंद्रपुर महानगर पालिका चा उपक्रम

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर २७ ऑगस्ट: येत्या गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेश मंडळ व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यात सार्वजनिक गणेश मंडळांनी मनपातर्फे देण्यात आलेल्या विषयांवर सजावट/देखावा करणे तसेच सार्वजनिक जागा सौंदर्यीकरण करणे अपेक्षित असुन यात प्रथम आलेल्या मंडळाला १ लक्ष रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

चंद्रपुर महानगर पालिका स्वच्छता विभागातर्फे गणेशोत्सव देखावे स्पर्धा गणेशोत्सव स्थापना ते विसर्जन पर्यंत देखावे स्पर्धा तसेच मंडळ परीसरात सार्वजनिक जागांचे सौंदर्यीकरण पंधरवाडा दिनांक ०२ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत राबविला जाणार असुन या दोन्ही स्पर्धांच्या तयारीवर गुणांकन दिले जाणार आहे. यात पर्यावरण पूरक मूर्ती, पर्यावरण पूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहीत वातावरण, गणेशोत्सव मंडळाने आवश्यक सर्व शासकीय परवानगी घेणे, सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा घेणे, निर्माल्यपासुन खत निर्मिती करणे, परिसराची स्वच्छता व शिस्त ठेवणे, मंडप परिसरात सामाजीक संदेश देणारे देखावा तयार करणे इत्यादींवर गुण दिले जाणार आहेत.  

रेन वाटर हार्वेस्टिंग, पर्यावरण संरक्षण व संवर्धन,पर्यावरण पुरक गाडी (ई व्हेईकल), स्वच्छ चंद्रपूर सुंदर चंदपूर या विषयांवर प्रचार प्रसिद्धी करणारे सजावट/देखावा गणेश मंडळांना करावयाचा आहे. यासोबतच शहराच्या वैभवाची साक्ष असणारे किल्ले यांची स्वच्छता करणाऱ्या मंडळांची विशेष दखल घेतली जाणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सर्व गणेश मंडळांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.    

👉🏻 अटी व शर्ती :-
मंडळ हे धर्मदाय आयुक्त यांचेकडे नोंदणी केलेले असावे किंवा महानगरपालिका चंद्रपूर यांची परवानगीधारक असणे बंधनकारक आहे.
मंडळ चंद्रपूर शहरातील असावे
सजावट/देखावा साठी कोणतेही साहित्य मनापाद्वारे पुरविण्यात येणार नाही.
सौंदर्यीकरणासाठी जागा ही चौक किंवा सार्वजनिक स्थळ/जागा असावे.
मनपा तर्फे झाडे व पेंटिंग कलर मर्यादित) पुरविण्यात येईल.
स्पर्धा गटाचे सहभागीतेवर बक्षीस रक्कम व रोख रक्कम कमी / जास्त करण्याचा अधिकार मनपा कडे  राहील
 
👉🏻 बक्षिसे :
▪️प्रथम पारितोषिक – १ लक्ष व ट्रॉफी व सन्मानपत्र.
▪️द्वितीय पारितोषिक – ७१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.
▪️तृतीय पारितोषिक – ५१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.
▪️टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु बनविणे  – २१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र
▪️प्रोत्साहनपर १० पारितोषिक - २१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.

Ganeshotsav beautification pandharwada, innovative competition on the occasion of Ganeshotsav, 1 lakh first prize, initiative of Chandrapur Mahanagar Palika