प्रशासकीय इमारतीच्या आगप्रकरणी पालकमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश In the case of the fire of the administrative building, the Chief Minister ordered the Collector to investigate


प्रशासकीय इमारतीच्या आगप्रकरणी पालकमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश

चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट : रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर लागलेल्या आगीच्या चौकशीचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर रविवारी पहाटे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचे  कार्यालयाला आग लागली. आगीत कार्यालयातील फाईल्स, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले. ही आग कशामुळे लागली त्याचे नेमके कारण शोधावे तसेच यामागे कोणत्या घातपातीचा तर हात नाही, याचाही शोध यंत्रणेने घ्यावा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

पहाटेच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासन कार्यालयातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच तातडीने फायर ब्रिगेडला प्रचारण करण्यात आले. यात फायर ब्रिगेडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे आगीचे लोन इमारतीतील इतर कार्यालयांत पसरले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

In the case of the fire of the administrative building, Minister ordered the Collector to investigate     Miniser Sudhir Mungantiwar
#In-the-case-of-the-fire-of-the-administrative-building,  #Minister-ordered-the-Collector-to-investigate
#chandrapur #Fire #Sudhir-Mungantiwar