जपान सरकारने देवेंद्र फडणवीस यांना 'स्टेट गेस्ट' दर्जाने केलं आमंत्रित, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्र्यांनाच दिला जायचा स्टेट गेस्ट दर्जा The Japanese government has invited Devendra Fadnavis as a 'state guest'.

⭕ जपान सरकारने देवेंद्र फडणवीस यांना 'स्टेट गेस्ट' दर्जाने केलं आमंत्रित

⭕ पंतप्रधान, परराष्ट्र मंत्र्यांनाच दिला जायचा स्टेट गेस्ट दर्जा 

#Loktantrakiawaaz
मुंबई: विदेशी गुंतवणूक, बेरोजगारी, प्रकल्पांचं स्थलांतर यावरुन राज्याचं राजकारण चांगलचं तापलं होतं. महाविकास आघाडी सरकाला खिंडार पाडत शिवसेना भाजप महायुतीचं सरकार स्थापन झालं. यानंतर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी विविध मुद्द्यांना विरोधकांनी पुढं आणलं. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता गुजरातला गेलेले महाराष्ट्राचे प्रकल्प. तांत्रिक अडचणींचा हवाला देत महायुती सरकारनं आपलं अंग या आरोपातून काढून घेतलं. मात्र, विरोधकांनी केलेलं डॅमेज कंट्रोल करण्याची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खांद्यावर घेतली. 

▪️पंतप्रधान, परराष्ट्र मंत्र्यांनाच दिला जायचा स्टेट गेस्ट दर्जा 
देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबईची ओळख आहे. मुंबईसह महाराष्ट्रात विविध प्रकल्प यावेत. राज्याची प्रगती अधिक वेगानं व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते. या प्रयत्नांचं फळ फडणवीसांना मिळणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. जपान सरकारने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'स्टेट गेस्ट' म्हणून आमंत्रित केलं आहे. विशेष म्हणजे फक्त पंतप्रधान आणि पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत स्टेट गेस्ट म्हणून परराष्ट्र मंत्र्यांना बोलवलं जातं. मात्र देवेंद्र फडणवीसांना आलेल्या या आमंत्रणानंतर फडणवीसांची राजकीय उंची आंतरराष्ट्रीय राजकारणात ही वाढल्याचं समर्थक सांगतायेत. 

▪️फडणवीस २० ते २५ ऑगस्टपर्यंत जपान दौऱ्यावर 
राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना अर्थ खातं सांभाळण्याचा चांगला अनुभव आहे. महाराष्ट्रात गुंतवणूकीचा टक्का वाढावा, विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी फडणवीस सततचे प्रयत्न करत होते. याचाच पुढचा टप्पा म्हणून त्यांच्या जपान दौऱ्याकडे पाहिलं जातंय. त्यांचा पाच दिवसीय जपान दौरा राज्याच्या अर्थकारणासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचं मत विश्लेष्क नोंदवतायेत. हा दौरा या महिन्याच्या अखेरीस पार पडेल. यावेळी ते जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची भेट घेणार आहेत. फडणवीस यांना स्टेट गेस्ट म्हणून निमंत्रण आल्यानं त्यांची राजकीय उंची आणखीन वाढल्याच चित्र आहे. 

▪️राजघराण्यांसोबत स्नेह भोजन 
जपानी भाषेत स्टेट गेस्टला 'कुकोहिन' म्हणून संबोधलं जातं. राष्ट्रप्रमुख किंवा त्याच्या समकक्षीय नेत्यालाच स्टेट गेस्ट म्हणून जपानचे सरकार आमंत्रण देते. आमंत्रित नेत्याला जपानमध्ये परमोच्च आदरातिथ्याने जपान सरकारच्यावतीने स्वागत केलं जातं. यावेळी तिथलं सरकार स्वागत समारंभ आयोजित करतं. या सोहळ्यास जपानचे राजघराणे उपस्थित असते. जपानी सम्राटांच्या हस्ते स्टेट गेस्ट म्हणून फडणवीसांचे स्वागत केले जाईल. शिवाय जपानच्या शाही महालात स्नेह भोजनाचे ही आयोजन केले जाणार आहे.    

▪️अधिकाऱ्यांचा लवाजमा असेल सोबत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याचे लक्ष्य महाराष्ट्र व खासकरुन मुंबईसाठी मोठी गुंतवणूक आणण्याचं आहे. यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचा एक गट फडणवीसांसोबत जपान दौऱ्यावर असेल. या अधिकाऱ्यांसोबत ते जपानमधील प्रमुख उद्योग कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या कंपन्याच्या यादीत सुनिटोमो, एनटीटी आणि सोनीसारख्या जगविख्यात कंपन्यांसोबत भविष्यातील गुंतवणीवर फडणवीस संवाद साधतील. यानंतर जपानची राजधानी असलेल्या टोकियोमध्ये फडणवीस बुलेटट्रेन व मेट्रोच्या कार्यप्रणालीचा आढावा घेणार आहेत. यानंतर जपानचे अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, पर्यटनमंत्री व उद्योग मंत्र्यांसोबत फडणवीसांची बैठक पार पडेल. 

▪️महत्त्वकांक्षी प्रकल्पांचा पाठपुरावा
समृद्धी महामार्गाच्या वचनपुर्तीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नव्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांवर काम करायाला सुरुवात केलीये. राज्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे प्रकल्प अत्यंत उपयोगाचे ठरणार आहेत. यात वर्सोवा विरार सी लिंक. ठाणे कोस्टल रोड आणि नागपुर- गोवा एक्सप्रेस वेच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या पुर्तीसाठी जपानकडून अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन घेण्याची फडणवीस प्रयत्न करतील. यासाठी ते राज्यातील मेट्रो प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्या 'जेआसीए'च्या अधिकाऱ्यांची भेट घेतील. सोबतच जपान- इंडिया असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करतील. 

▪️राजकीय उंची वाढणार?
महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री पदाची जबाबदारी फडणवीसांना मिळणार असल्याचे कयास बांधले गेले. मात्र ऐनवेळी शिवसेनेत बंड घडवून आणणाऱ्या एकनाथ शिंदेना ही जबाबदारी मिळाली. मागच्या पंचवार्षिकला मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. फक्त पक्ष शिस्तीमुळे फडणवीस हे पद स्वीकारत असल्याची चर्चा रंगली. विरोधी बाकावर गेलेल्या मविआच्या नेत्यांनी फडणवीसांची राजकीय उंची कमी झाल्याची विधानं केली.

The Japanese government has invited Devendra Fadnavis as a 'state guest'.

#TheJapaneseGovernmentHasInviteDevendraFadnavisAsA'StateGuest'
#MaharashtraGovernment  #DevendraFadnavis #StateGuest  #Maharashtra  #MaharashtraSarkar