आमदार सुधाकर अडबाले व्यवस्थापन परिषदेवर, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठ विधानपरिषदेच्या उपसभापतींनी केली निवड MLA Sudhakar Adbale on Management Council, Kavi Vice Chancellor Kalidasa Sanskrit University Elected by the Deputy Speaker of the Legislative Council

आमदार सुधाकर अडबाले व्यवस्थापन परिषदेवर,

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठ 

विधानपरिषदेच्या उपसभापतींनी केली निवड

नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांची राज्यातील एकमेव रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापतींनी ही नियुक्ती केली असून, राज्याचे अवर सचिव पुष्पा दळवी यांनी याबाबतचे पत्र जारी केले आहे.
रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठ हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विधानपरिषदेच्या सदस्यांची उपसभापतींकडून नियुक्ती केली जाते. त्यानुसार नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी २०२९ पर्यंत ही निवड राहणार आहे. या निवडीबद्दल आमदार सुधाकर अडबाले यांचे माजी आमदार व्‍ही.यु. डायगव्‍हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्रावण बरडे, प्रांतीय पदाधिकारी, जिल्‍हाध्यक्ष, जिल्‍हा कार्यवाह, जिल्‍हा पदाधिकारी, सदस्य व संस्कृत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष ॲड. मोहन वाहने, महासचिव प्रा डॉ दिलीप चौधरी, छात्रविर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा चंद्रपूरचे अध्यक्ष सुभाष ठोंबरे, प्राचार्य डॉ विलास ढोणे, तसेच महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयाचे अध्यक्ष रविकांत रागीट रामटेक, नेताजी गोरे उस्मानाबाद, शंकरराव कदम वसमत, विवेक शिंदे भद्रावती, सुधाकर खरवडे वरोरा, कैलाश काळे परभणी, केशव राठोड औरंगाबाद यांनी अभिनंदन केले आहे.

MLA Sudhakar Adbale on Management Council,

 Kavi Vice Chancellor Kalidasa Sanskrit University

Elected by the Deputy Speaker of the Legislative Council