चंद्रपुर महानगर पालिका तर्फे निघणार तिरंगा रॅली Tiranga Rally will be held by Chandrapur Mahanagara Palika

चंद्रपुर महानगर पालिका तर्फे निघणार तिरंगा रॅली
 
चंद्रपूर १० ऑगस्ट -
माझी माती माझा देश व हर घर तिरंगा अभियानातंर्गत चंद्रपूर महानगरपालिके तर्फे शनिवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता तिरंगा रॅली काढली जाणार असुन जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा हस्ते सदर रॅलीस हिरवी झेंडी दाखविली जाणार आहे.

     भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मनपातर्फे विविध कार्यक्रम घेतल्या जात आहेत. तिरंगा रॅलीद्वारे नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. या वर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे.या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा व आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीस प्रारंभ केला जाणार आहे.    

   चंद्रपुर शहरातील छोटुभाई पटेल शाळा, एफईएस गर्ल्स ,सिटी कन्या, हिंदी सिटी, सिटी माध्यमिक लोकमान्य टिळक विद्यालय, लोकमान्य शाळा, न्यू इंग्लीश, किदवई तसेच नूतन माध्यमिक अश्या १० शाळा या रॅलीत सहभागी होणार आहेत. शाळेतील मोठ्या मुलांचा रॅलीत सहभाग राहणार असुन ही सर्व मुले हातात राष्ट्रध्वज धरून चंद्रपुर महानगर पालिका कार्यालय गांधी चौक येथुन आझाद बगीचापर्यंत मार्गक्रमण करणार आहेत. आझाद बगीचा येथे रॅलीचा समारोप होणार असुन त्यानंतर हातात माती घेऊन पंचप्रण शपथ घेतली जाणार आहे.

Tiranga Rally will be held by Chandrapur Mahanagara Palika

 Chandrapur 10th August - Tiranga  rally will be organized by Chandrapur Municipal Corporation on Saturday 12th August at 8 am under the Mazhi Mati Mazha Desh wa Har Ghar Tiranga campaign and the rally will be flagged off by Collector Vinay Gowda.

 On the occasion of Amrit Mahotsav of Indian Independence, various programs are being organized by the Municipal Corporation.  The objective of the campaign is to awaken patriotism in the minds of the citizens through the tricolor rally.  This year also the Independence Day will be celebrated with great enthusiasm and joy by hoisting the tricolor from house to house. Under this initiative, the rally will be started by showing the green flag by Collector Vinay Gowda and Commissioner Vipin Paliwal.

Chotubhai Patel School, FES Girls, City Kanya, Hindi City, City Madhyamik Lokmanya Tilak Vidyalaya, Lokmanya School, New English, Kidwai and Nutan Madhyamik will participate in this rally.  Senior school children will participate in the rally and all these children will hold the national flag in their hands and march from Chandrapur Municipal Corporation office Gandhi Chowk to Azad Bagicha.  The rally will be concluded at Azad Baghi, after which the Panchprana oath will be taken with soil in hand.