28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर On September 28, a holiday has been announced for primary, secondary and higher secondary schools in the chandrapur district

28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर

चंद्रपूर, दि. 27 सेप्टेंबर : अनंत चतुर्दशी निमित्त गणपती विसर्जनाच्या वेळी वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण होऊ नये तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून चंद्रपुर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आली आहे. तर चंद्रपुर जिल्ह्यातील महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयीन कामकाज गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी नियमितपणे सुरू राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तसेच राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे चंद्रपुर जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

On September 28, a holiday has been announced for primary, secondary and higher secondary schools in the chandrapur district

 #School holiday  #announced  #primary  #secondary #highersecondary #schools  #chandrapurdistrict