भारतीय सशस्त्र सैन्य दलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी मोफत सुवर्णसंधी FREE GOLDEN OPPORTUNITY FOR OFFICER PRE-TRAINING IN INDIAN ARMED FORCES

भारतीय सशस्त्र सैन्य दलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी मोफत सुवर्णसंधी

चंद्रपूर, दि. 08 सेप्टेंबर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतींसाठी दि. 3  ते 12 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत एस.एस.बी कोर्स क्र.54 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवास, भोजन व प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

चंद्रपुर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे.

मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (other-PCTC Nashik-SSB 54) कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करून दिले जाईल किंवा 9156073306 या व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावर SSB-54 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट व्हाट्सॲपद्वारे पाठविले जातील. प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन व पूर्णपणे भरून सोबत घेऊन यावे.

एस.एस.बी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक पात्रता व प्रमाणपत्र:
कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) पास असावी व त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.एन.सी.सी. 'सी' सर्टिफिकेट, 'ए' किंवा 'बी' ग्रेडमध्ये पास झाले असावे. एन.सी.सी ग्रुप हेडक्वार्टर्सने एस.एस.बी साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर तसेच युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम साठी एस.एस.बी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांचा ई-मेल आयडी pctcoic@yahoo.in व 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष येऊन भेट द्यावी. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

FREE GOLDEN OPPORTUNITY FOR OFFICER PRE-TRAINING IN INDIAN ARMED FORCES

Pre-Student Training Center, Nashik for the young men and women of Maharashtra to prepare for the Service Selection Board (SSB) examination for eligible candidates to be recruited as officers in the Indian Army, Navy and Air Force.  SSB Course No.54 is being conducted from 3 to 12 October 2023.  Free accommodation, food and training have been provided to the trainees for this course.

Interested candidates of Chandrapur district to avail the opportunity of army officer post at District Soldier Welfare Office, Chandrapur dt.  Attend the walk-in interview on 25 September 2023.

#officers #IndianArmy  #Navy #AirForce #SSBCourse  #DistrictSoldierWelfareOfficeChandrapur  #FREEGOLDENOPPORTUNITY #OFFICERPRE-TRAININGININDIANARMEDFORCES