दुग्ध व दुधजन्य पदार्थातील भेसळ संदर्भात प्रशासनाची कडक कारवाई
चंद्रपूर, दि. 15 सेप्टेंबर : चंद्रपुर जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. चंद्रपुर जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत धडक मोहिमेअंतर्गत धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांकडून दही, पनीर, खोवा यांचे नमुने घेण्यात आले. व सदर नमुने अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ ही बाब शासनाने गांभीर्याने घेतली असून दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ होणार नाही यासाठी सदरचे धाडसत्र सुरू असून यापुढेही राहणार आहे.
गठीत समितीकडून आजपर्यंत 15 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. धाडी दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मॉ भगवती नारायण डेअरी चिंचाळा, येथील दूध व पनीरचे नमुने घेण्यात आले. सदर नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गोल बाजारातील लक्ष्मी डेअरी येथील दुधामध्ये माशा, कीटक व कचरा असल्यामुळे 40 लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले व स्वच्छतेबाबत सक्त ताकीद देण्यात आली. सिस्टर कॉलनी येथील कृष्णा डेअरीमध्ये अंदाजे 1 किलो पनीरला बुरशी व सडका वास असल्याने सदर पनीर नष्ट करण्यात आले. यासोबतच वजन-मापे विभागाकडून तपासणी करून ज्या ठिकाणी वजन-मापेची पासिंग नसल्यामुळे सदर मापे जप्त करण्यात आले व त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने पंचनामे करून तात्काळ पासिंग करण्याबाबत ताकीद देण्यात आली.
दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करीत असलेल्या सर्व दुकानदार व व्यापाऱ्यांनी जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा तसेच दुग्धजन्य पदार्थाचा पुरवठा करावा. अन्यथा शासन निर्णयानुसार चंद्रपुर जिल्ह्यातील संयुक्त पथकामार्फत धाडीदरम्यान दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे व समितीकडून करण्यात आले आहे.
Strict action by the administration regarding adulteration of milk and milk products
#StrictActionByTheAdministration #RegardingAdulterationOfMilkAndMilProducts #StrictAction #Administration #Regarding #Adulteration #Milk #MilkProducts