महिला सशक्तीकरणाच्या हेतूने सरकारने घेतलेल्या निर्णय बद्दल राज्य सरकारचे धन्यवाद - चित्रा किशोर वाघ भाजपा, महिला प्रदेशाध्यक्ष
मुंबई: महाराष्ट्र राज्यात मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे या सर्वसमावेशक महिला सशक्तीकरणाच्या हेतूने सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १ एप्रिल २०२३ पासून पुढे जन्मलेल्या मुलींना सरकार लखपती करणार आहे.
एका कुटुंबात एक मुलगी असो किंवा दोन मुली जन्माला येवो.. त्या दोघींनाही हा लाभ मिळणार आहे. मुलगी जन्मल्यानंतर ५ हजार रु., पहिलीला गेली की ६ हजार रु., सहावीला गेली की ७ हजार रु. अकरावीला गेली की ८ हजार रु. आणि १८ वर्षांची झाली की ७५ हजार रु. असा लाभ मिळत या पद्धतीने एकूण १ लाख १ हजार रु. मिळवत आपल्या राज्यातल्या या लाडक्या लेकी लखपती होणार आहेत.
मार्च २०२३ अर्थसंकल्पिय भाषणात तत्कालीन अर्थमंत्री आमचे नेते-राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या ‘लेक लाडकी योजनेची’ घोषणा केली होती.. आणि आता ही योजना अंमलात येतेय.
यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचे लाख लाख धन्यवाद.
-चित्रा किशोर वाघ
भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष
The lake in Maharashtra will now become Lakhpati, thanks to the state government - Chitra Kishore Wagh BJP, Women's State President
#ThelakeinMaharashtra #Lakhpati #stategovernment #ChitraKishoreWagh #BJP #Women'sStatePresident #भाजपा #Maharashtra