मूल येथे व्हाईस आफ मिडीया तर्फे पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा
चंद्रपुर (मूल) : माध्यमांनी गुलामगिरीची सवय आता मोडून काढली पाहिजे. त्यासाठी रविश कुमार यांना पत्रकारांचे आयकॉन म्हणून ओळखले पाहिजे. अभिव्यक्तीची गळचेपी होणार नाही याविषयी सगळ्यांनी दक्ष असणे गरजेचे असल्याचे मत व्हाईस आफ मीडीयाचे राष्टीय कार्याध्यक्ष संजय आवटे यांनी व्यक्त केले. मूल येथे दि. 2 आक्टोबर रोजी आयोजित एक दिवशीय पत्रकारांची कार्यशाळा व मान्यवरांचा गौरव सोहळा या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्हाईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी तर्फे मूल येथे विदर्भ विभागीय पदाधिकारी तथा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांची एकदिवसीय कार्यशाळा येथील स्वर्गीय मा.सा.कन्नमवार सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटिका आमदार प्रतिभाताई धानोरकर या होत्या.त्यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे होते. विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, विनोद दत्तात्रय, शेतकरी नेते रविकांत तुपकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनूले, राज्य संघटक सुनील कुहिकर, आनंद आंबेकर,प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे, कार्यशाळेचे संयोजक गुरु गुरनूले, रोहिदास राऊत, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष व्यंकटेश दुडूमवार, प्रकाश कथले, व्हाईस ऑफ मीडिया चंद्रपुर जिल्हा साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोगड, विजय सिद्धावार, आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेची सुरुवात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी निधी जंबूलवार हिने गणेश वंदनपर नृत्य सादर केले.तसेच कला निकेतनच्या चमूने वैष्णव जन तो... हे भजन सादर केले. मान्यवरांचं कुमकुम तिलक करून स्वागत करण्यात आले. पुढे बोलताना संजय आवटे म्हणाले की, देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण आणि जातीय दंगली घडवण्याचे काम सुरू आहे.समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे. अशावेळी पत्रकारांनी आपली ठोकपणे भूमिका निभावली पाहिजे. पत्रकारांनी वास्तविकता सांगावी. जातीय सलोखा आणि सोहार्द टिकवण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न केलं पाहिजे. आजच्या जगामध्ये खरी पत्रकारिता करण्याचं खरे आव्हान उभे राहिलं आहे. पत्रकारांनी सर्वसामान्य लोकांचा आवाज निर्माण केला पाहिजे. त्यांचा विश्वास त्यांनी कायम ठेवला पाहिजे. सकारात्मक पत्रकारिता माध्यमकर्मीणी केली पाहिजे. बदलणारे जग माध्यमांना कळलं पाहिजे, अशी रोखठोक भूमिका संजय आवटे यांनी मांडली. लोकशाही धोक्यात येते तेव्हा पत्रकारांचा कस लागतो असेही संजय आवटे पुढे म्हणाले.
व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप काळे यावेळी बोलताना म्हणाले की, पत्रकारांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. सकारात्मक पत्रिकारितेमध्ये खूप मोठी ताकद असते. आपल्या कार्यामध्ये सर्वांनी जीव ओतून काम केलं पाहिजे. यासाठी त्यांनी मूल येथील जिलेबी विकणाऱ्या एका हरियाणातील माणसाचे उदाहरण त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी व्हाईस ऑफ मीडिया तर्फे एक कृतीशील कार्यक्रम राबवण्याचा उद्देश असल्याचे संदीप काळे यांनी यावेळी सांगितले. देणेकरी म्हणून आपण काय काय देऊ शकतो, या विचारांसाठी बारामती येथे एक अधिवेशन होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.केंद्राकडे आपण पत्रकार महामंडळ स्थापन करावे अशा पद्धतीची मागणी करण्यात आल्याचे संदीप काळे यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी 200 कोटी रुपये मिळावे अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले. तळमळीने काम करून व्हाईस ऑफ मीडिया चा झेंडा देशात सगळीकडे फडकला पाहिजे. अशा पद्धतीचं एक आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. जो प्रामाणिक पणे काम करतो त्याला निश्चितच यश मिळते, असाही विश्वास संदीप काळे यांनी बोलून दाखविला. त्यांनी यावेळी रविकांत तुपकर यांची राष्ट्रीय संचालक म्हणून नियुक्ती केली. आजपासून ते पूर्णवेळ काम करतील असे त्यांनी सांगितले.
या वेळी पत्रकार सुनील कुहीकर म्हणाले, लेखणीची ताकद समाज हितासाठी वापरणे गरजेचे आहे. कारण पत्रकारांमध्ये समाज परिवर्तनाचे काम आहे. पत्रकारितेचा उपयोग समाज हितासाठी केला पाहिजे असे सुनील कुहिकर यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे यांनी केले.यावेळी विनोद दत्तात्रय, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटिक यांनी आपले मनोगत सादर केले. उद्घाटन सत्राचे संचालन प्राध्यापिका राज्यश्री मार्कंडेवार यांनी केले. तर आभार नासिर हासमी यांनी केले.
पत्रकारांनी समाजासाठी चांगले काम करीत असताना समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले
यावेळी बोलताना आ. प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, पत्रकार हा समाजाचा चौकीदार आहे. संघटनात्मक बांधणी करताना पत्रकारांनी अतिशय दक्ष असले पाहिजे. नेतृत्व आणि व्यक्तिमत्व घडवण्याचं काम पत्रकारांनी केलं पाहिजे. व्हाईस ऑफ मीडिया आपल्या क्षेत्रामध्ये अधिक प्रगती करीत राहो अशी शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. पत्रकारांनी जमिनीवर राहून काम करावे. त्यांनी आपले ध्येय आकाशासारखं उंच ठेवले पाहिजे. संघटना हेच आपलं कुटुंब आहे. या संघटनेमध्ये काम करीत असताना येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये मी तुमच्या सोबत राहीनं अशा पद्धतीचा एक आशावाद प्रतिभाताई धानोरकर यांनी व्हाईस ऑफ मिडीया ला दिला. संघटनेना उच्च शिखर गाठो अशीही शुभेच्छा त्यांनी यावेळी दिली.
Media must break the habit of slavery now - One Day Workshop for Journalists by Vice of Media at Sanjay Awte
#Mediamustbreakthehabitofslaverynow - #OneDayWorkshop #Journalists #ViceofMedia at #Sanjay Awte