धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा जीवनप्रवास", या विषयावर मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन, केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम On the occasion of Dhammachakra Anupravarthan Day, a multimedia photo exhibition on the theme "Life of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar the Great Man", organized by the Central Bureau of Communications, Wardha Regional Office from today

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा जीवनप्रवास" 

या विषयावर मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन

◆ केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम

चंद्रपूर, दि. 13 ऑक्टोबर - धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयातर्फे  15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान चंद्रपूर येथील दीक्षाभूमी वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे तीन दिवस "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास" या विषयावर आधारीत मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 
प्रदर्शनाचे उदघाटन रविवार 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. हे प्रदर्शन 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत नागरीकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत विविध छायाचित्र लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले आहे. 

On the occasion of Dhammachakra Anupravarthan Day, a multimedia photo exhibition on the theme "Life of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar the Great Man", organized by the Central Bureau of Communications, Wardha Regional Office from today

#OnTheoccasion #DhammachakraAnupravarthanDay,  #multimediaphotoexhibition  #theme #"LifeofBharatRatnaDr.BabasahebAmbedkartheGreatMan"  #CentralBureauofCommunications, #WardhaRegionalOffice  #BharatRatnaDr.BabasahebAmbedkar
#Dr.BabasahebAmbedkar