चंद्रपूर जिल्ह्यात कृषिपंपांना २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा : आमदार प्रतिभाताई धानोरकर Provide 24-hour three-phase power supply to agricultural pumps in Chandrapur district: MLA Pratibhatai Dhanorkar

चंद्रपूर जिल्ह्यात कृषिपंपांना २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा : आमदार प्रतिभाताई धानोरकर

चंद्रपूर : चंद्रपुर जिल्हा हा ऊर्जानिमिर्ती करणारा जिल्हा आहे. खासगी व शासकीय वीजनिर्मिती केंद्राच्या माध्यमातून ४४२० मे. वॉ.  वीजनिर्मिती होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झुडपी व मोठे जंगल आहे. रात्रीपाळीत शेतकरी कृषिपंपातून शेतीला पाणीपुरवठा करीत असतात. यावेळी हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यावर हल्ला करीत असतात. यात शेकडो शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात  २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे  

चंद्रपुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. जिल्ह्यांत कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल आहेत. १ एप्रिल २०२० पासून जिल्ह्यात कृषिपंप जोडणी च्या मागण्या प्रलंबित आहेत. ज्यांना कनेक्शन दिलेत त्यांना अखंडित वीजपुरवठा होत नाही. भारनियमना ऐवजी म. रा. वि. वि. कंपनीने  थ्री फेस वीजपुरवठ्याचे जिल्ह्यात वेळापत्रक घोषित केले आहे.  आठवड्यातून ४ दिवस आणि ३ दिवस रात्री ८ तास कृषिपंपाना वीजपुरवठा करण्यात येत आहे. परंतु २४ तास  थ्री फेस पुरवठा दिल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल.

   महाजनको कडून ग्रीड मार्फत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार  थ्री फेस वीजपुरवठा मिळालाच पाहिजे हि आपली आग्रही  भूमिका असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे. 


 ग्रामीण भागात असल्यामुळे वीजपुरवठा १ फेस असल्यामुळे इतर उपकरणे चालत नाही. पाणी टाकी वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे भरली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठा देखील अनेकदा सुरळीत सुरु नसतो. असे अनेक प्रश्न उद्भवत असतात. या समस्या तात्काळ निकाली काढण्याकरिता चंद्रपूर जिल्हात २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

Provide 24-hour three-phase power supply to agricultural pumps in Chandrapur district: MLA Pratibhatai Dhanorkar

#Provide24-hourthree-phasepowersupplytoagriculturalpumps  #ChandrapurDistrict  #MLAPratibhataiDhanorkar #MLA