चंद्रपुर जिल्ह्यातील दुय्यम निबंधकास दहा हजाराची लाच घेताना रंगेहात अटक registrar of Chandrapur district arrested red-handed for taking bribe of ten thousand

चंद्रपुर जिल्ह्यातील दुय्यम निबंधकास दहा हजाराची लाच घेताना रंगेहात अटक

चंद्रपुर (मुल), 12 ऑक्टोबर : दुय्यम निबंधक श्रेणी-१, मुल येथील श्रीमती वैशाली वैजनाथ मिटकरी, वय ४४ वर्ष, व्यवसाय नोकरी, पद-मुल्यांकन दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक कार्यालय चंद्रपूर प्रभारी दुय्यम निबंधक – श्रेणी-१, मुल जि. चंद्रपूर यांचे विरुद्ध १५,०००/- रूपये मागणी करून तडजोडीअंती १०,०००/- रू. स्विकारल्या संबंधाने अॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने आज रोजी कार्यवाही केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे मौजा मारोडा, ता. मुल, जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन दस्तलेखनाचे काम करतो. तकारदार यांचेकडे त्यांचे पक्षकार यांची मौजा मुल येथील शेत जमिन दुसन्या व्यक्तीचे नावे करायचे काम होते. त्यांकरीता दिनांक ११/१०/२०२३ रोजी तक्रारकर्ते हे पक्षकाराचे मौजा मुल येथील शेती संबंधी दस्त नोंदणीचे कागदपत्रे तयार करून दुय्यम निबंधक कार्यालय, मुल येथील गै.अ. श्रीमती वैशाली मिटकरी दुय्यम निबंधक यांचेकडे जाऊन दस्त तपासणी व शेत जमिनीचे मुल्यांकन काढुन दस्ताची मुद्रांक व नोंदणी फी बाबत विचारणा केली असता दुय्यम निबंधक श्रीमती मिटकरी मॅडम यांनी दस्त नोंदणीचे काम करून देण्याकरीता गैरअर्जदार यांना शासकीय शुल्का व्यतिरीक्त १५,०००/- रूपयांची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना गैरअर्जदार यांस लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली.

प्राप्त तकारीवरून आज दिनांक १२/१०/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत पाटील यानी तकारदाराने दिलेल्या तकारीची गोपनीयरित्या शहानिशा करून पडताळणी / सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणी कार्यवाहीदरम्यान गै.अ. श्रीमती वैशाली मिटकरी दुयम निबंधक यांनी शेतीचे दस्त नोंदणी करण्याचे कामाकरीता तडजोडीअंती १०,०००/- रू लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून दुयम निबंधक कार्यालय मुल येथे पंचासमक्ष कार्यवाहीदरम्यान आ.लो.से. श्रीमती वैशाली वैजनाथ मिटकरी, मुल्यांकन दुय्यम निबंधक यांना १०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरू आहे.

सदरची कार्यवाही श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर तसेच श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, लाज वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोहवा. हिवराज नेवारे, पो.अ. वैभव गाडगे, अमोल सिडाम, म. पो.अ. पुष्पा काचोळे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व चा.पो.अ. शामराव बिडगर मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली आहे. हॅश व्हॅल्यु घेण्यात आलेली आहे.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्याच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यानी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यानी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा…

श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर,
श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय नागपूर ०७१२-२५६१५२०

श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर- ९३२२२५३३७२
श्री. प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर- ९१३०५५६१६१

श्री. जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर-८८८८८५७१८४

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०७१७२-२५०२५१
टोल फ्रि क्रमांक १०६४
Website: www.acbmaharashtra.gov.in


registrar of Chandrapur district arrested red-handed for taking bribe of ten thousand

#registrarofChandrapurdistrictarrested red-handedfortakingbribeOfTenthousand
#bribe #Chandrapur  #acbchandrapur