भारत-पाकिस्तान सिमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला नागपूर विमानतळ परिसर
नागपूर, दि १३ ऑक्टोबर :अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत ढोल-ताशांच्या गजरात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. चंद्रपूर, वर्धा, नागपुरातील भाजप कार्यकर्ते व शिवभक्तांच्या गर्दीने यावेळी नागपूर विमानतळाचा परिसर फुलुन गेला होता.
विमानतळावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पेशवेकालीन टोपी, शाल-श्रीफळ आदी वस्तू भेट देत त्यांचा सत्कार केला. आनंदी कार्यकर्त्यांनी व शिवभक्तांनी ना. श्री. मुनगंटीवार यांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार पंकज भोयर ,आश्विनी जिचकार, भाजपा प्रदेश सचिव राजेश बकाने,वर्धा भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, बंटी (जीतेंद्र) कुकुडे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर, विष्णू चांदे महानगर संघटन मंत्री नागपूर,बादल राऊत भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर,चंद्रपूरच्या माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी भाजपा महानगर अध्यक्ष चंद्रपूर डॉ.मंगेश गुलवाडे,निलेश किटे, सुभाष कासनगोटूवार,ब्रीजभूषण पाझारे, जयंत कावळे, राजू मुक्कावार,सचिन बोगावार, स्वप्नील कलुरवार आदींनी स्वागत केले.
यावेळी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी व येत्या काळात भारतात आणण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाले. त्यामुळे आपण स्वत:ला अत्यंत भाग्यवान मानतो. वाघनखांसह महाराजांची जगदंबा तलवार आणि लंडनच्या संग्रहालयातील महाराष्ट्राच्या वारसाची साक्ष देणाऱ्या इतर वस्तुही लवकरच भारतात येण्याकरीता आपण पूर्ण प्रयत्न करू असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी ठामपणे व्यक्त केला.
लंडन आणि जपानचा दौरा आटोपल्यानंतर आपण भारतात परतलो त्यावेळी आपले भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. शिवभक्तांच्या या प्रेम आणि आपुलकीने आपण भारावलो आहोत. हा क्षण आपण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.
भारत-पाक सिमेवर महाराजांचा पुतळा उभारणार
आम्ही पुणेकर या संस्थेने श्रीनगरातील कुपवारा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सिमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र शासन त्यांना यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. सिमेवर हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला हा पुतळा पाहुनच धडकी भरेल, असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.
Sudhir Mungantiwar's welcome to the vice capital, a statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be erected on the India-Pakistan border, Chhatrapati Shivaji Maharaj's cheers at Dumdumla Nagpur Airport area
#Sudhir Mungantiwar #welcome #capital #statue #Chandrapur #ChhatrapatiShivajiMaharaj #India-Pakistanborder Chhatrapati #ShivajiMaharaj #cheers #NagpurAirport