नवरात्रोत्सवात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी तीन दिवस निश्चित, हे तीन दिवस सवलतीचा दिवस म्हणून असणार Three days are fixed for the use of loudspeakers and loudspeakers during Navratri festival These three days will be as concession days

नवरात्रोत्सवात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी तीन दिवस निश्चित

हे तीन दिवस सवलतीचा दिवस म्हणून असणार

चंद्रपूर, दि. 12 ऑक्टोबर : केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 अन्वये तसेच ध्वनी प्रदूषण(नियमन व नियंत्रण) नियम, 2000 च्या नियम 5(3)नुसार, ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी, ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यासाठी, संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याकरीता सन-2023 मधील 10 सवलतीचे दिवस निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी 5 दिवस राखीव ठेवण्यात आले आहे.  निश्चित करण्यात आलेल्या 10 दिवसांपैकी अष्टमी दि. 22 ते 23 ऑक्टोबर 2023 हे 2 दिवस नवरात्र उत्सवाकरीता निश्चित करण्यात आले आहे.

तसेच, आमदार किशोर जोरगेवार यांनी नवरात्रोत्सवात माता महाकाली महोत्सवाकरीता पंचमी, षष्टी व सप्तमी दि. 19 ते 21 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वाजविण्यास सवलत मिळण्याकरीता विंनती केली आहे. त्याअनुषंगाने, नवरात्र उत्सवादरम्यान श्री. माता महाकाली महोत्सवाकरीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी, राखीव ठेवण्यात आलेल्या 5 दिवसापैकी 1 दिवस दि. 19 ऑक्टोबर रोजी पंचमी निमित्त सवलतीचा दिवस म्हणून निश्चित करण्यात येत आहे.

निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिका-यांकडून परवानगी घेऊनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, असे जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

Three days are fixed for the use of loudspeakers and loudspeakers during Navratri festival These three days will be as concession days

#Threedaysarefixedfortheuseofloudspeakers  #loudspeakersduringNavratrifestival #concessiondays  #Navratrifestival