टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम- मनसे अध्यक्ष राज ठाकरे, टोलचा सर्व कॅशचा पैसा जातो कुठे? Toll is the biggest scam in Maharashtra - MNS President Raj Thackeray, where does all the cash money of toll go?

टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम- मनसे अध्यक्ष राज ठाकरे

टोलचा सर्व कॅशचा पैसा जातो कुठे?

मुंबई, 09 ऑक्टोबर: टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केली आहे. देवेंद्र फडणवीस टोलच्या मुद्द्यावरून धांदात खोटं बोलत आहेत, असं सांगतानाच टोल हा काही काश्मीरचा विषय नाही. टोल रद्द केले नाही तर आम्ही टोल नाके जाळून टाकू असा संतप्त इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दोन दिवसानंतर मी टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. फोर व्हिलर, टू व्हिलरला टोल नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्याप्रमाणे आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभे राहतील आणि फोर व्हिलर, टू व्हिलरला कोणत्याही प्रकारचा टोल लावू दिला जाणार नाही. आणि याला जर कुणी विरोध केला तर हे टोलनाके जाळू. पुढे काय सरकारला करायचे ते त्यांनी करावं, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस काल टोलबाबत जे म्हणाले ते खरं आहे का? याला धांदात खोटं असंच म्हणायचं ना? मग हे पैसे जातात कुठे? कुणाकडे जातात? खऱ्या अर्थाने पाहिलं तर टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. याची शहानिशा झाली पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली.

चार दिवसापूर्वी पाच ठिकाणी जी टोलवाढ झाली. त्याविरोधात उपोषणाला बसले होते. मला राज्य सरकारने एक पत्र दिलं. त्यात कुणाला टोल आहे आणि कुणाला नाहीये याची माहिती होती. आमचं टोलचं आंदोलन 2009-2010 च्या सुमारास सुरू झालं. टोलचा सर्व कॅशचा पैसा जातो कुठे? त्याचं होतं काय? त्याच त्याच कंपन्यांना टोल मिळतात कसे? त्यानंतर शहरातील रस्त्यांवर खड्डे पडत असेल तर टोलचा पैसा जातो कुठे? सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे जातात कुठे?, असे सवाल राज ठाकरे यांनी केले.

Toll is the biggest scam in Maharashtra - MNS President Raj Thackeray, where does all the cash money of toll go?

#TollisthebiggestscaminMaharashtr-MNSPresidentRajThackeray      #cashmoney  #toll  #MNSPresidentRajThackeray  #MNS #PresidentRajThackeray #RajThackeray #TollTax