सिटीपीएस संच क्रमांक 3 व 4 त्वरीत बंद करण्याची शासनाकडे मागणी, इको-प्रो चे सातव्या दिवशी प्रदुषण नियत्रंण मंडळ कार्यालय व अधिकारी (एमपीसीबी) ‘साकडं घाला सत्याग्रह’, प्रादेशिक अधिकारी सावंत यांनी स्वीकारले निवेदन - चंद्रपूर प्रदुषणमुक्ती करीता सत्याग्रह Demand to Govt to close Cstps project 3 & 4 immediately, Eco-Pro on seventh day Pollution Control Board Office and Officers (MPCB) Satyagraha statement accepted by Regional Officer Sawant - Chandrapur Pollution Free Satyagraha

सिटीपीएस संच क्रमांक 3 व 4 त्वरीत बंद करण्याची शासनाकडे मागणी

इको-प्रो चे सातव्या दिवशी प्रदुषण नियत्रंण मंडळ कार्यालय व अधिकारी (एमपीसीबी) ‘साकडं घाला सत्याग्रह’

प्रादेशिक अधिकारी सावंत यांनी स्वीकारले निवेदन - चंद्रपूर प्रदुषणमुक्ती करीता सत्याग्रह

चंद्रपूर: प्रदुषणामुळे बाधीत नागरीकांचे तपासण्या, उपचाराकरीता प्रभावी योाजना राबवा 
चंद्रपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमीत्ताने इको-प्रो तर्फे सुरू असलेल्या एक दिवस एक आंदोलन शृघले अंतर्गत आज सातव्या दिवशी चंद्रपुरच्या प्रदुषणमुक्ती करीता तसेच सिटीपीएसचे कालबाहय प्रदुषीत संच क्रमांक 3 व 4 त्वरीत बंद करण्याची तसेच चंदीगडच्या धर्तीवर ‘एअर प्युरीफायर टॉवर’ शहरात उभारण्याच्या मागणीसह अन्य मागण्या शासनाकडे करीत ‘‘प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालय व अधिकारी यांना (एमपीसीबी) साकडं घाला सत्याग्रह’’ आंदोलन करण्यात आले.

चंद्रपूर शहर राज्यातील सर्वाधिक प्रदुषीत शहराच्या यादीत वरच्या स्थानावर असल्याने, राज्याच्या विजेची गरज सोबतच खनिजांची गरज पुर्ण करून चंद्रपूरकरांच्या वाटयाला कायम प्रदुषण, आजार हेच मिळाले आहे. चंद्रपूरचे प्रदुषण कमी व्हावे म्हणुन वेळोवेळी अनेक आंदोलने, पाठपुरावा तसेच जनहित याचिकाच्या माध्यमाने अनेक संस्था-संघटना लढत असतात मात्र याकडे हवे तसे लक्ष शासनाच्या वतीने करण्यात येत असल्याचे दिसुन येत नाही. प्रदुषण नियंत्रणासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नोटीसा देणे, बॅक गॅरन्टी जप्त करणे या पलिकडे काही होताना दिसत नाही. यासाठी राज्यातील शहरा-शहरातील प्रदुषणाची तीव्रता बघता, बाधीत जनतेच्या हिताचा, आरोग्याचा विचार करता भविष्यात प्रदुषण विरोधात कार्यवाहीचे स्वरूप व अंमलबजावणी बाबत शासनाने वाढत्या प्रदुषणाविरोधात धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

2006 पासुन चंद्रपूरच्या प्रदुषणाबाबत अनेक अॅक्शन प्लान आले मात्र अमलबंजावणी हवी तशी झालेली नाही. अलिकडे जिल्हातील व शहरातील नदयाचे जलप्रदुषणाची समस्या गंभीर आहे. नागरी सांडपाणी पासुन तर उदयोगीक प्रदृषित पाणी सर्रास नदयात प्रवाहीत केले जात आहे. तसेच जिल्हयातील तलावाची स्थिती सुध्दा गंभीर असुन जलप्रदुषण ठिकठिकाणी होत आहे. यासाठी सुध्दा कृती आराखडे आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थाची जवाबदारी आहे, नगर विकास विभागाची जवाबदारी आहे. मात्र याबाबत कृती होताना दिसत नाही. यापुर्वी इको-प्रो ने शहरातील प्रदुषणाविरोधात ‘अन्नत्याग सत्याग्रह’, धरणे आंदोलन, पदयात्रा तसेच जनहित याचीकाच्या माध्यमाने सिटीपीएस संच क्रमांक 1 व 2 साठी लढा दिलेला आहे. रेलवे मालधक्का प्रदुषण विरोधातही संघर्ष केलेला आहे. भविष्यात प्रदुषणाच्या मागण्यासंदर्भात इको-प्रो सत्याग्रह आंदोलनाच्या भुमीकेत असणार आहे.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे चंद्रपूरकरास प्रदुषणाच्या त्रासापासुन मुक्त करण्यास थातुरमाथुर उपाययोजना करण्यापेक्षा आवश्यक व कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीकरीता व प्रदुषणमुक्तीच्या मागण्यासाठी आज इको-प्रो तर्फे प्रतिकात्मक आंदोलन करीत विविध मागण्याकरीता एमपीसीबीला ‘साकडं घाला सत्याग्रह’ करण्यात आले, येत्या काळात या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्यास लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे. 

आज करण्यात आलेल्या एमपीसीबीला ‘साकडं घाला सत्याग्रहाच्या मागण्या मध्ये सिटीपीएस कालबाहय संच क्रमांक 3 व 4 तात्काळ बंद करण्यात यावे, सिटीपीएस संच क्रमांक 5, 6 व 7 सुध्दा जुने संच होणारे प्रदुषण नियत्रणात आणुन टप्प्या-टप्प्याने बंद करण्याचा कार्यक्रम जाहीर करणे, चंद्रपूर शहरात प्रदुषण नियंत्रणसाठी चंदीगडच्या धर्तीवर महानगरपालिकेकडुन प्रस्तावित ‘एअर प्युरीफायर टॉवर’ ला त्वरीत मंजुरी प्रदान करावी, वायु प्रदुषण व नदी प्रदुषण कृती आराखडयाची संबधीत विभागाकडुन त्वरीत अंमलबजावणी करणे, सिटीपीएस/वेकोली परिसरातील वाढलेली काटेरी झुडपे काढुन त्याठिकाणी सौर उर्जा प्रकल्प दोन्ही उदयोगाने सुरू करणे, चंद्रपूरात प्रदुषणाने बाधीत नागरीकांचे तपासण्या, उपचाराकरीता मोफत व प्रभावी योजना राबविणे, चंद्रपूर शहरात महानगरपालिकेने तसेच इतर प्रदुषीत नगर पालिका क्षेत्रात ‘हवा गुणवत्ता दर्शविणारी यंत्रणा’ उभारावी, महाराष्ट्र महानगरपालीका व नगर परिषद (सुधारित) कायदा 1994 मधिल कलम 67-अ नुसार ‘पर्यावरण सध्यस्थिती अहवाल’ त्वरीत तयार करावे, जिल्हा पर्यावरण समीती घोषीत करून नियमित सभा व कार्यान्वीत करणे आदी मागण्या शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत.

आज इको-प्रो तर्फे संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांचे नेतृत्वात करण्यात आलेल्या सत्याग्रह मध्ये नितीन रामटेके, धर्मेद्र लुनावत, ओमजी वर्मा, राजु काहीलकर, अब्दुल जावेद, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, कुणाल देवगीरकर, प्रितेश जीवने, सुधीर देव, भारती शिंदे, चित्राक्ष धोतरे आदी सहभागी होते.
Demand to Govt to close Cstps project 3 & 4 immediately, 

Eco-Pro on seventh day Pollution Control Board Office and Officers (MPCB) 'Sakadam Gela Satyagraha',

 statement accepted by Regional Officer Sawant - Chandrapur Pollution Free Satyagraha

#Demand-to-Govt-to-close-Cstps-project-3-&-4-immediately     #Eco-Pro  #Pollution-Control-Board-Office  #Officers-MPCB #MPCB  #Satyagraha #Regional-Officer   #Sawant  #Chandrapur-Pollution-Free-Satyagraha #Pollution