मूल: संजना सोयामची विभागीय संघात निवड शालेय क्रिडा स्पर्धेत राज्यस्तरावर कबड्डी खेळात मूल येथील नवभारत कन्या विद्यालयाची विद्यार्थीनी संजना अजय सोयाम हीची निवड झाल्यांने तीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. विभागीय चाचणी गोंदीया येथे झालेल्या निवड चाचणीत संजनाची निवड विभागीय कबड्डी संघात झाली.
शालेय क्रिडा स्पर्धेत नवभारत कन्या विद्यालयाची कबड्डीची चमु जिल्हयात खेळली होती. या सामन्यातून उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केल्यांने संजनाची निवड विभागीय संघासाठी निवड चाचणी करीता करण्यात आली होती. निवड चाचणीतही तीने दमदार कामगीरी केल्यांने नागपूर विभागीय कबड्डी संघात तीची निवड करण्यात आली असून, ती सोलापुर जिल्हयातील सांगोला तालुक्यात होणार्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत नागपूर विभागाकडून खेळणार आहे.
नागपूर विभागीय कबड्डी संघात निवड झालेली संजय सोयाम ही चंद्रपूर जिल्हयातील एकमेव विद्यार्थीनी आहे. तीचे अभिनंदन शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे, सचिव अॅड. अनिल वैरागडे, कार्याध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार, पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे, क्रिडा शिक्षक दिनेश जिड्डीवार यांनी अभिनंदन केले आहे.
Selection of Sanjana Soyam in the regional team