2 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात तीन दिवस जाणता राजा, चांदा क्लब ग्राउंडवर रंगणार महानाट्य janata raja Mahanatya will be staged at Chanda Club ground in Chandrapur for three days from February 2

2 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात तीन दिवस जाणता राजा

चांदा क्लब ग्राउंडवर रंगणार महानाट्य

चंद्रपूर, दि. 24 जानेवारी : शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य 'जाणता राजा ' चंद्रपूरकरांच्या भेटीला येत आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका मार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 2, 3, व 4 फेब्रुवारी 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे प्रयोग होणार आहेत.
       जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, उपायुक्त मंगेश खवले, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, मुख्याधिकारी विशाल वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे आदी उपस्थित होते
     राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पद्मविभूषण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे  लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगणार आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.
       दररोज सायंकाळी 6 वाजता या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण 200 च्या वर कलाकार करणार आहेत.

janata raja Mahanatya will be staged at Chanda Club ground in Chandrapur for three days from February 2

#Janata-Raja  #Chtrapati #Shivaji-Maharaj  #Chanda-Club-Ground  #Chandrapur  #Raje  #maharaj