7 व 8 एप्रिलला विनापरवाना ड्रोन प्रक्षेपण व वापर करण्यास मनाई, पंतप्रधानांच्या दौ-यानिमित्त जिल्हाधिका-यांचे आदेश निर्गमित Prohibition of unlicensed drone launch and use on April 7 and 8 Collector orders issued on the occasion of Prime Minister's visit


7 व 8 एप्रिलला विनापरवाना ड्रोन प्रक्षेपण व वापर करण्यास मनाई

पंतप्रधानांच्या दौ-यानिमित्त जिल्हाधिका-यांचे आदेश निर्गमित

चंद्रपूर, दि. 5 अप्रैल :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 8 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्हा दौ-याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच अवकाशीय उपकरणांद्वारे (फ्लाईंग ऑब्जेक्ट, ड्रोन इत्यादी) चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत दि. 7 एप्रिलच्या रात्री 12.01 वाजतापासून 8 एप्रिलच्या रात्री 24 वाजेपर्यंत विना परवाना व बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण व ड्रोनचा वापर करण्यास मनाई आदेश पारीत करण्याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक यांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. 
या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) मधील कलम 144 (1)(3) अन्वये चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत दि. 7 एप्रिलच्या रात्री 12.01 वाजतापासून 8 एप्रिलच्या रात्री 24 वाजेपर्यंत विना परवाना व बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण व ड्रोनचा वापर करण्यास मनाई आदेश पारीत केला आहे. सदर आदेश 5 एप्रिल 2024 रोजी जिल्हादंडाधिकारी विनय गौडा यांच्या स्वाक्षरीने पारीत करण्यात आला आहे.

Prohibition of unlicensed drone launch and use on April 7 and 8

Collector orders issued on the occasion of Prime Minister's visit

Chandrapur