मी तीनशे विकासकामे केली, त्यांनी एकवीस तरी सांगावीत!, सुधीर मुनगंटीवार विरोधकांवर कडाडले, राजुरा विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमध्ये जाहीर सभा, चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात घेतली आघाडी I did three hundred development works, they should say at least twenty one!, Sudhir Mungantiwar lashed out at opponents, held public meetings in many villages in Rajura assembly constituency, took the lead in campaigning for Chandrapur Lok Sabha elections.


मी तीनशे विकासकामे केली, त्यांनी एकवीस तरी सांगावीत!

सुधीर मुनगंटीवार विरोधकांवर कडाडले

राजुरा विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमध्ये जाहीर सभा

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात घेतली आघाडी


चंद्रपूर,दि. १२ एप्रिल २०२४ :  धृतराष्ट सांगू शकतील एवढी विकासकामे, मी चंद्रपूर जिल्ह्यात माझ्या मतदार संघात केली आहेत. मी फक्त विकासाचं राजकारण करतो, जातीपातीच घाणेरडे राजकारण उभ्या आयुष्यात केले नाही. मी तीनशेच्या वर विकासकामे केली आहेत, त्याची यादी तुमच्यासमोर वाचून दाखवितो. पण विरोधकांनी त्यांच्या काळात २१ कामे केली आहेत का? हे जनतेला त्यांनी सांगावं, असं म्हणत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट) व मित्रपक्ष  महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार जाहीर सभेत विरोधकांवर चांगलेच कडाडले.

राजुरा विधानसभा मतदार संघात गुरुवारी त्यांनी झंझावाती प्रचारदौरा केला. यावेळी त्यांनी अनेक गावांमध्ये जाहीर सभा, प्रचार यात्रा घेऊन खेड्यापाड्यातील गावांना भेटी दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. ते बोलतांना म्हणाले की, जनतेसमोर मी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा सादर करीत आहो. पण माझे प्रतिस्पर्धी विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. मागील पाच वर्षात राजुरा विधानसभा मतदार संघाचा विकास रखडला आहे. नागरिकांना जाण्या-येण्यासाठी साधे रस्ते करता आले नाहीत, त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.  
या भागात पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, वीज पुरवठ्याचा प्रश्न असेल मी लोकसभेत निवडून आल्यानंतर तातडीने मार्गी लावणार पण त्यासाठी आपण मला आशीर्वाद रूपी मत दिले पाहिजे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले. यावेळी प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी हात वर करून आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असे सांगत जोरदार घोषणा दिल्यात. ना. मुनगंटीवार यांनी सास्ती,तोहगाव, लाठी, धाबा आदी ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. तर गोवरी, चुनाळा,  विरूर, चकदरूर, भंगाराम तळोधी, विठ्ठलवाडा, वढोली, खरारपेठ आदी ठिकाणी प्रचार यात्रा घेतल्या. तसेच गोवरी, माथरा, रामपूर, विहीरगाव, मूर्ती, नलफ़डी, सिंधी, धानोरा, धानापूर, करंजी, आक्सापुर, सरांडी, सोनापूर देशपांडे, सकमुर, दरुर, चकपारगाव, खराळपेठ आदी गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि प्रश्न समजून घेतले.

यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, बंडू हजारे, सुरेश धोटे, सुरेश रागीट,मधुकर नरड, सुनील उरकुडे, सुभाष बोनगिरवार, सचिन शेंडे, अरुण लोखंडे, सरपंच सुचिता मावलीकर, प्रतीक चन्ने, जिल्हा परिषद सदस्य स्वाती वडपल्लीवार, गणेश पिसे, महेंद्र बोबडे, प्रवीण मुनगंटीवार, विपुल भडी, गजानन झाडे, भारत कुळसंगे, बंडू धोटे, सुरेश वांढरे, सुनीता उरकुडे, प्रकाश फुटाणे, स्नेहा दरेकर, मीरा वांढरे, सरपंच बाळू वडस्कर, सिद्धार्थ पथोडे, अरुण मस्की, विलास बोनगीरवार, संजय पावडे, प्रशांत घरोटे, विनायक देशमुख, बबन निकोडे, अमर बोडलावार, दीपक सातपुते, निलेश पुलगमकार, स्वप्नील अनमुलवार, राजेंद्र गोहणे, हिरा कंदिगुरवार, निळकंठ लखमापुरे, रुपेश लिंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सुधीर भाऊ राजुरा मतदार संघातील प्रश्न सोडवतील माजी आ. संजय धोटे
राजुरा विधानसभा मतदार संघ विकासापासून कोसो दूर आहे. या मतदार संघात विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा  लागत आहे. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची ताकद असेल तर ती फक्त सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यातच आहे. आपण सर्वांनी झोकून देऊन सुधीरभाऊंना लोकसभा निवडणुकीत लाखो मतांनी विजयी करून त्यांना संसदेत पाठविले तरच केंद्रातील निधी आपल्या जिल्ह्याला आणि विधानसभा मतदार संघाला मिळेल आणि आपल्या क्षेत्राचा विकास होईल अशी भावना माजी आमदार संजय धोटे यांनी बोलून दाखविली.

विकासासाठी एकच पर्याय सुधीरभाऊ - माजी आ. सुदर्शन निमकर
आजवर आम्ही अनेक नेते बघितले आहेत. शब्द देतात आणि वेळ आली की विसरून जातात. पण आपले सुधीरभाऊ मुनगंटीवार इथे अपवाद ठरतात. आम्ही जेव्हा-जेव्हा त्यांच्याकडे विषय ठेवला तेव्हा-तेव्हा त्यांनी दिला शब्द केला पूर्ण या उक्तीप्रमाणे सर्व प्रश्न आणि अडचणी मार्गी लावल्या आहेत. त्यांच्याकडे समस्या गेली कि त्यावर शंभर टक्के इलाज असतो. असा एक हि प्रश्न नसेल की जो सुधीर भाऊंनी सोडविला नसेल. त्यामुळे लोकसभेत आपल्या हक्काचा उमेदवार निवडून पाठविणे गरचेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले.

I did three hundred development works, they should say at least twenty one!, Sudhir Mungantiwar lashed out at opponents, held public meetings in many villages in Rajura assembly constituency, took the lead in campaigning for Chandrapur Lok Sabha elections

#I-did-three-hundred-development-works  #they-should-say-at-least-twenty-one  #Sudhir-Mungantiwar #public-meetings i  #Rajura-assembly-constituency #Campaigning #BJP #Chandrapur-Lok-Sabha-Election