प्रत्येक मतदारसंघात विशेष मतदान केंद्र, महिला, दिव्यांग व युवा व्यवस्थापित मतदान केंद्राचे नियोजन Planning of Special Polling Stations, Women, Disabled and Youth Managed Polling Stations in each Constituency


प्रत्येक मतदारसंघात विशेष मतदान केंद्र

महिला, दिव्यांग व युवा व्यवस्थापित मतदान केंद्राचे नियोजन

चंद्रपूर, दि. 13 अप्रैल : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तशी निवडणूक विषयक कामांची लगबग सुध्दा वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रात किमान सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघात विशेष मतदान केंद्र राहणार असून यात आदर्श मतदान केंद्रासह महिला, दिव्यांग व युवा व्यवस्थापित मतदान केंद्राचा समावेश आहे.

13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक आदर्श मतदान केंद्र, महिला व्यवस्थापित एक मतदान केंद्र, दिव्यांग व्यवस्थापित एक मतदान केंद्र आणि युवा कर्मचारी व्यवस्थापित एक मतदान केंद्र याप्रमाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 24 मतदान केंद्र विशेष राहणार आहे.

मतदारसंघनिहाय आदर्श मतदान केंद्र : राजूरा विधानसभा मतदारसंघात बामणवाडा येथे आदर्श मतदान केंद्र राहणार आहे. चंद्रपूर मतदारसंघात पोलिस कल्याण हॉल, चंद्रपूर येथे, बल्लारपूर मतदारसंघात बालविकास प्राथ. शाळा रुम नं. 1, मूल येथे, वरोरा मतदारसंघात कर्मवीर प्राथ. विद्यालय रुम. नं. 4, वरोरा येथे, वणी मतदारसंघात जि.प.बांधकाम विभाग कार्यालय रुम नं. 4 वणी तर आर्णि मतदारसंघात एसपीएम गर्ल्स प्राय. स्कूल बिल्डींग रुम नं. 1, घाटंजी येथे आदर्श मतदान केंद्र राहणार आहे.

आदर्श मतदान केंद्रात रॅम्प, व्हीलचेअर, प्रथमोपचार पेटी, मदत कक्ष, स्वतंत्र प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष, पाळणाघर, उष्मघातापासून वाचण्यासाठी सूचना फलक, पुरेशी प्रकाश व्यवथा, पिण्याच्या पाण्याची सुविधा व इतर बाबी राहणार आहेत. 

महिला कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र : राजूरा विधानसभा मतदारसंघात महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल रुम नं. 1, राजुरा येथे महिला कर्मचा-यांच्या वतीने चालविण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे. चंद्रपूर मतदारसंघात सेंट मायकल कॉन्व्हेंट रुम नं. 1, चंद्रपूर येथे, बल्लारपूर मतदारसंघात नगर परिषद मूल रुम नं. 1 येथे, वरोरा मतदारसंघात लोकमान्य वरिष्ठ महाविद्यालय रुम नं. 3 वरोरा येथे, वणी मतदारसंघात पी.एस. वणी ऑफिस बिल्डींग (मध्यभाग) येथे तर आर्णि मतदारसंघात जि.प. शासकीय विद्यालय रुम नं. 2, पांढरकवडा येथील मतदान केंद्रांत संपूर्ण व्यवस्थापन महिलांचे राहणार आहे.

दिव्यांग कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र : राजूरा विधानसभा मतदारसंघात महात्मा जि.प. उच्च प्राथ. शाळा रुम नं. 1, कोरपना येथे दिव्यांग कर्मचा-यांच्या वतीने चालविण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे. चंद्रपूर मतदारसंघात वन अकादमी रुम नं. 2, चंद्रपूर येथे, बल्लारपूर मतदारसंघात जि.प. प्राथमिक स्कूल, सोमनाथ प्रकल्प येथे, वरोरा मतदारसंघात जि.प. प्राथ. स्कूल रुम नं. 1, आनंदवन येथे, वणी मतदारसंघात जि.प. बांधकाम विभाग कार्यालय रुम नं. 3 येथे तर आर्णि मतदारसंघात म्युनिसीपल उर्दु स्कूल रुम नं. 2, पांढरकवडा येथील मतदान केंद्रांत संपूर्ण व्यवस्थापन दिव्यांग कर्मचा-यांचे राहणार आहे.

युवा कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र : राजूरा विधानसभा मतदारसंघात जि.प. प्राथमिक शाळा नवीन इमारत रुम नं. 1, अवालपूर येथे युवा कर्मचा-यांच्या वतीने चालविण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे. चंद्रपूर मतदारसंघात डॉन इंग्लिश कॉन्व्हेंट, पोलिस लाईन तुकम, चंद्रपूर येथे, बल्लारपूर मतदारसंघात नगर पंचायत सभागृह, पोंभुर्णा येथे, वरोरा मतदारसंघात पंचायत समिती कार्यालय, नवीन बिल्डींग रुम नं. 1, वरोरा येथे, वणी मतदारसंघात राणी लक्ष्मीबाई प्राथ. हिंदी स्कूल क्रमांक 10, रुम नं. 3 येथे तर आर्णि मतदारसंघात एमडी विद्यालय रुम नं. 1, गांधी नगर, आर्णि येथे युवा कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र राहणार आहे.

Planning of Special Polling Stations, Women, Disabled and Youth Managed Polling Stations in each Constituency

#Planning-Of-Special-Polling-Stations #Women-Disabled-And-Youth-Managed-Polling-Stations-in-each-Constituency #Loksabha-Chunav #Chandrapur #Chandrapur-Loksabha