चंद्रपूर : 21 मे 2024 रोजी 12 वी निकाल जाहीर झाला, त्यात विद्या निकेतन, कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूरच्या कुमारी रिध्दी राज पुगलिया हिच्या घवघवीत यशाने पुन्हा एकदा विद्या निकेतन, कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर उत्साहाने गजबजले. कुमारी रिध्दी राज पुगलिया हिने कनिष्ठ महाविद्यालयातील, विज्ञान शाखेमधुन 85.83 टक्के प्राप्त करत, कनिष्ठ महाविद्यालयामधून दुसरा क्रमांक पटकावला.
त्यातच तिने कनिष्ठ महाविद्यालयामधुन इंग्रजी या विषयात 100 पैकी 92 मार्क मिळविले आणि फलोत्पादन या विषयात 200 पैकी 187 मार्क मिळवित सर्वाधिक गुण प्राप्त केले.
तिने या यशासाठी संपूर्ण श्रेय कनिष्ठ महाविद्यालया प्राचार्य, शिक्षक तसेच पुगलिया परिवारातील मंडळीना दिले.
या यशासाठी विद्या निकेतन, कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. त्यात तिच्या पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी व शिक्षणासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक तसेच पुगलिया परिवारानी भरभरून शुभेच्छा दिल्या.
Kumari Riddhi Raj Puglia's stellar success