रामाला तलावात ही अतिक्रमण हटाओ मोहिम सुरु करा, रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटने ची मागणी Start a campaign to remove this encroachment in Ramala Lake Demand of Ramala Lake Protection and Conservation Association

रामाला तलावात ही अतिक्रमण हटाओ मोहिम सुरु करा
  रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटने ची मागणी
  चंद्रपुर: चंद्रपूर शहर महानगरपरिषने सुरु केलेली अतिक्रमण हटाओ मोहिम उपयुक्त उपक्रम आहे। या कार्यासाठी आमचे सहकार्य राहिल।या साठी महानगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन। या मोहिमे अंतर्गत रामाला तलावात होत असलेले अतिक्रमण काढुन चंद्रपूर शहरातील एकमात्र ऐतिहासिक रामाला तलावाचे संरक्षण करावे, अशी मागणी रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेच्यावतीने महानगरपालिके चे अतिरिक्त आयुक्तांना करण्यात आली।
     रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेच्या शिष्टमंडलाने अतिरिक्त आयुक्त चंदन येवले यांचेशी चर्चा करुन रामाला तलावात झालेले अतिक्रमण काढुन चंद्रपूर शहरातील भूगर्भ जल संवर्धन करणार्या तलावाचे संरक्षण करावे अशी मागणी केली। अतिरिक्त आयुक्त महोदयांनी या अतिक्रमणाचा कायदेशीर अभ्यास करुन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले।
      रामाला तलाव संरक्षण व संवर्धन संघटनेचे मनोज जुनोनकर, प्रा डा जुगलकिशोर सोमाणी, मुरलीमनोहर व्यास, सुधीर बजाज यांनी चर्चा करतांना आयुक्तांना सांगीतले कि, प्रशासनाच्या दुर्लक्षा ने चंद्रपूर शहरातील पांच तलाव अतिक्रमणग्रस्त होऊन नष्ट झालेले आहेत।आता हा तलाव देखिल अतिक्रमणाच्या तावडीत सापडून अर्धा नष्ट झालेला आहे। याला वाचविण्याची जवाबदारी महानगरपालिकेची आहे। 
  शिष्ट मंडला ने लक्षात आणुन दिले कि,लोकसभेच्या जलसंवर्धन समितीच्या नियमानुसार आणि उच्चन्यायालयाच्या निर्णयानुसार जलस्त्रोतांवर कुणीही अतिक्रमण करुच शकत नाही। जर कुणी अतिक्रमण केले असेल तर ते काढण्याची जवाबदारी स्थानिय प्रशासनाची आहे|

Start a campaign to remove this encroachment in Ramala Lake

 Demand of Ramala Lake Protection and Conservation Association

#Start #campaign  #remove #encroachment #Ramala-Lake

  #Ramala-Lake-Protection-and-Conservation-Association