Anti Corruption Bureau चंद्रपुरची मोठी कारवाई, शिक्षण विभाग (माध्यमीक), जिल्हा परिषद चंद्रपुर येथे कारवाई Big operation of Anti Corruption Bureau Chandrapur, Education Department (Secondary), Action at Zilla Parishad Chandrapur

Anti Corruption Bureau चंद्रपुरची मोठी कारवाई 

शिक्षण विभाग (माध्यमीक), जिल्हा परिषद चंद्रपुर येथे कारवाई 

चंद्रपुर, 27 सप्टेंबर : कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये नवीन कोर्स सुरू करण्यासंदर्भात शासनाकडून मान्यता मिळण्यासाठी शिक्षण विभागातील 2 विस्तार अधिकारी व एक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजाराच्या लाच मागणी प्रकरणी आज 27 सप्टेंबर ला अटक केली.

तक्रारदार हे चंद्रपुरातील रहिवासी असून त्यांचे कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूट मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी GCC व TBC Computer lnstitute कोर्स सुरू करायचा असल्याने याबाबत फिर्यादी यांनी सदर कोर्स बाबत शासन मान्यता मिळावी यासाठी चंद्रपुर जिल्हा परिषद शिक्षण विभागात अर्ज केला, यावेळी शिक्षण विभाग माध्यमिक विस्तार अधिकार 1) सावन चालखुरे, 56 वर्षीय 2) लघुत्तम किसन राठोड विस्तार अधिकारी यांची तक्रारदार यांनी भेट घेतली. मात्र दोन्ही अधिकारी यांनी प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या कामाकरिता शिक्षणाधिकारी मॅडम पैसे मागत असून तुम्ही ते दिल्याशिवाय तुमचे काम होणार नाही असे सांगत 70 हजार रुपयांची लाच मागितली.
लाच द्यायची इच्छा नसल्याने फिर्यादी यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात 31 जुलै 2024 रोजी तक्रार दिली. वेळोवेळी तक्रारदार यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी यांनी 70 हजार रुपयांची मागणी केली, त्यानंतर तडजोडीअंती 50 हजार रुपये द्यावे असे सेवानिवृत्त जेष्ठ सहायक महेश्वर फुलझेले यांनी अपप्रेरणा दिली.

सदर तक्रारीची पडताळणी झाल्यावर आज 27 सप्टेंबर रोजी 1) सावन चालखुरे, 2) लघुत्तम राठोड व 3) महेश्वर फुलझेले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून पुढील तपास कार्य सुरू आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, रमेश दुपारे, अरुण हटवार, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, मेघा मोहूर्ले, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम यांनी केली.

Big operation of Anti Corruption Bureau Chandrapur, Education Department (Secondary), Action at Zilla Parishad Chandrapur

#ACB 
#Big-operation  #Anti-Corruption-Bureau #Chandrapur  #Education-Department- (Secondary),  #Zilla-Parishad- Chandrapur