चंद्रपुर: आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून 7 ऑक्टोबरपासून चंद्रपूरात आयोजित श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने माता महाकाली मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात चंद्रपूर महानगरपालिकेनेही सहभाग घेतला होता. यावेळी मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मनपा आयुक्त विपिन पालिवार, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त राजेंद्र भिलावे, सहायक आयुक्त सूर्यवंशी, मुख्य स्वच्छता अधिक्षक अमोल शेडके यांच्या सह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या नवरात्रीमध्येही आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 ऑक्टोबरपासून सदर महोत्सवाला सुरुवात होणार असून यासाठी महाकाली मंदिर परिसराच्या बाजूला भव्य पंडाल उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महोत्सवाच्या आगमनापूर्वी मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी, चंद्रपूर महानगरपालिका आणि माता महाकाली भक्तांनी अभियानात सहभागी होऊन परिसर स्वच्छ केला. यावेळी माता भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Cleanliness campaign at Mata Mahakali Temple on the occasion of Mata Mahakali Festival
#Mata-Mahakali #Chandrapur-Mahakali #Mahakali-Temple #Mata-Mahakali- Festival