पोक्सो गुन्हयातील आरोपीला 20 वर्ष कारावासाची शिक्षा Accused in POCSO crime sentenced to 20 years imprisonment

पोक्सो गुन्हयातील आरोपीला 20 वर्ष कारावासाची शिक्षा

चंद्रपुर: पोलीस स्टेशन जिवती हद्दीतील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्न करतो म्हणुन फुस लावुन पळवुन नेवुन तिचेशी जबरीने लैंगिक अत्याचार करणाÚया 21 वर्षीय आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन जिवती येथे सन 2020 मध्ये कलम 376, 376 (2), (एन), (जे),  506 भादंवि सहकलम 4, 5 (1) व 6 लैंगिक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा 2012 अन्वये गुन्हा नोंदविण्यात येवुन गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रेखा काळे यांनी करुन आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असता आज दिनांक 22/10/2024 रोजी कोर्ट विद्यमान श्री अ.व्हि.दिक्षीत, विशेष सत्र न्यायाधिश चंद्रपूर यांचे न्यायालयात 21 वर्षीय आरोपीला 20 वर्ष कठोर कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 
  सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकार तर्फे सहा.सरकारी अभियोक्ता श्री डी.व्ही. महाजन आणि पैरवी अधिकारी म्हणुन पोअं/1117 दिनेष गरमडे पोस्टे जिवती यांनी कामगिरी बजावली आहे.

Accused in POCSO crime sentenced to 20 years imprisonment

#AccusedinPOCSOcrime 
#imprisonment
#POCSOCrime
#POCSO 
#Crime