नागपूरमध्ये शालिमार एक्स्प्रेसचे डबे घसरले Coaches of Shalimar Express derailed in Nagpur

नागपूरमध्ये शालिमार एक्स्प्रेसचे डबे घसरले, 

मोठी दुर्घटना टळली

नागपूर : महाराष्ट्र राज्यात एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. लाखो चाकरमान्यांना गावाचे वेध लागले आहे. अशातच नागपूरमध्ये रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. शालिमार एक्स्प्रेसचे (Shalimar Express) एस टू आणि पार्सलचे दोन डबे ट्रकवरून खाली उतरले आहे. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शालिमार एक्स्प्रेसचे एस टू (S -2) आणि पार्सलचे दोन (Parcel) डबे ट्रकवरून खाली उतरले आहे. कुर्ला- शालिमारकडे एक्स्प्रेस नागपुरातून जात असताना कळमना भागातून काही अंतरावर अचानक रेल्वेचे दोन डबे पटरीच्या खाली उतरले. यात एस टू आणि पार्सलचा एक डब्बा आहे. एक्सप्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासन काम सुरू आहे. या मार्गावरील काही गाड्या प्रभावीत झालेल्या आहे. तसंच काहींचे मार्ग बदलण्यात आले आहे. दुरुस्तीचं काम हे काम युद्धपातळीवर सुरू असून पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन ते तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Coaches of Shalimar Express derailed in Nagpur

#CoachesofShalimarExpressderailedinNagpur
#Coaches 
#ShalimarExpress 
#Railway 
#Nagpur