आता ची मोठी बातमी, काँग्रेसने तिसरी यादी जाहीर केली, महाविकास आघाड़ी मध्ये चाललंय काय? आता काँग्रेसने दिला ठाकरे गटाविरोधात उमेदवार! Now the big news, Congress announced the third list, what is going on in Mahavikas Aghadi? Now the Congress has given a candidate against the Thackeray group!

💥 आता ची मोठी बातमी 💥

🔹काँग्रेसने तिसरी यादी जाहीर केली

🔹महाविकास आघाड़ी मध्ये चाललंय काय? 

🔹आता काँग्रेसने दिला ठाकरे गटाविरोधात उमेदवार!

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता उपस्थितीत झाला आहे. आज ठाकरे गट,  काँग्रेस आणि शरद पवार गटाने आपआपल्या याद्या जाहीर केल्या आहेत. पण काही ठिकाणी ठाकरे गटाने शरद पवार गटाच्या विरोधात तर कुठे काँग्रेसने ठाकरे गटाच्या विरोधात उमेदवार दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधला घोळ काही मिटायचं नाव घेत नाहीये.

काँग्रेसने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने दोन उमेदवार दिले. काँग्रेसने माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे दिग्रस विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात आता शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अशी लढत होणार आहे. जयस्वाल हे एकेकाळचे संजय राठोड यांचे कट्टर समर्थक होते. आता त्यांच्या रूपाने संजय राठोड  यांच्यासमोर तगडे आव्हान दिले. पण, काँग्रेसने आता माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देऊन आणखी घोळ वाढवला आहे.

👉🏻 काँग्रेसची तिसरी यादी

कामगाव - राणा सानादा
मेळघाट - हेमंत चिमोटे
गडचिरोली - मनोहर पोरेटी
दिग्रास - मानिकराव ठाकरे
नांदेड दक्षिण - मोहनरान आंबडे
देगलुर - निवृत्तीराव कांबळे
मुखेड - हेमंतराव पाटील
मालेगाव सेंटर - एजाज बेग एजिज बेग
चांदवड - शिरिशकुमार कोतवाल
एक्वतपुरी - लाकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम - ध्यानंद चोरघे
अंधेरी पश्चिम - सचिन सावंत
वांद्रे पश्चिम - असिफ झकारिया
तुळजापूर - कुलदीप कदम पाटील
कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर
सांगली - पृथ्वीराज पाटील

Now the big news, Congress announced the third list,
 what is going on in Mahavikas Aghadi?  Now the Congress has given a candidate against the Thackeray group!

#AICC 
#Congress 
#MVA 
#UBT 
#AssemblyElection2024
#MaharashtraAssemblyElection 
#UdhavThakrey
#ShivsenaUBT