केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चंद्रपूर येथे 15 नोव्हेंबरला जाहीर सभा, ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ करणार संबोधित Union Home Minister Amit Shah's public meeting at Chandrapur on November 15, Along with Sudhir Mungantiwar, he will address the campaigning of Mahayutti candidates

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चंद्रपूर येथे 15 नोव्हेंबरला जाहीर सभा

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ करणार संबोधित

नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन


चंद्रपूर - बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह क्षेत्रातील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ 15 नोव्हेंबर 2024 ला केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते ना. श्री. अमितजी शाह यांची जाहीर सभा चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंड येथे दुपारी 4.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

देशाचे सर्वांत यशस्वी आणि दमदार गृहमंत्री म्हणून ना. श्री. अमितजी शाह यांची ओळख आहे. देशातील गुन्हेगारांवर वचक मिळवून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अमितजी शाह यांना यश आलं आहे. चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर दुपारी 4.00 वाजता मा.अमितजी शाह चंद्रपूरकरांशी संवाद साधतील.

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर विधानसभेतील विकासाला अधिक गती प्राप्त झाली आहे. बल्लारपूर विधानसभेचा चेहरामोहरा बदलला असून यापुढेही अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आणणार आहे. भाजपा महायुती उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ केंद्रिय गृहमंत्री अमितजी शाह यांच्या आयोजीत जाहीर सभेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आणि चंद्रपूर महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे यांनी केले आहे.

Union Home Minister Amit Shah's public meeting at Chandrapur on November 15, Along with Sudhir Mungantiwar, he will address the campaigning of Mahayutti candidates

#UnionHomeMinisterAmitShah'spublicmeetingatChandrapur  
#SudhirMungantiwar 
#campaigning 
#Mahayutti 
#candidates
#AmitShah 
#ChandrapurAssemblyElection2024
#AssemblyElection2024
#BallarpurAssemblyElection2024
#KishorJorgewar 
#BJP