Ø वरोरा नाका ते प्रियदर्शनी चौकपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद
Ø नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा
#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर, दि. 09 जानेवारी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 10 जानेवारी 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून येथील प्रियदर्शनी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून कार्यक्रमादरम्यान उपस्थित असणारे मान्यवर व इतर नागरिकांची वरोरा नाका ते प्रियदर्शनी चौक या मार्गावरून आगमन व निर्गमन होणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे.
मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम-33(1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयोजना व नियमनासाठी सदर दौरा कार्यक्रम असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास तसेच गैरसोय होऊ नये याकरिता वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत असून त्याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे.
दि. 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वरोरा नाका ते प्रियदर्शनी चौक पर्यंतचा मार्ग हा सर्व प्रकारच्या वाहनाकरिता बंद राहील. तसेच सदरचा मार्ग "नो पार्किंग झोन" व "नो हॉकर्स झोन" म्हणून घोषित करण्यात येत आहे.
सर्व वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा : या कालावधीत नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका- उड्डाणपूल- सिद्धार्थ हॉटेल- बस स्टॅन्ड- प्रियदर्शनी चौक मार्गे किंवा मित्र नगर चौक- संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश करतील. तसेच सदर कालावधीत शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी जटपुरा गेट- प्रियदर्शनी चौक- बस स्टॅन्ड चौक- सिद्धार्थ हॉटेल- उड्डाणपूल- वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक- मित्र नगर चौक मार्गे बाहेर जातील.
नागरिकांनी सदर अधिसूचनेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.
Changes in traffic system in view of Chief Minister Devendra Fadnavis' visit to Chandrapur district, the road from Varora Naka to Priyadarshini Chowk is closed for all types of vehicles, citizens should take alternative routes
#ChangesIntrafficsysteminviewOfChiefMinisterDevendraFadnavis'visittoChandrapurdistrict
#WaroraNakaToPriyadarshiniChowk
#vehicles
#citizens should take
#alternativeroutes
#ChiefMinisterDevendraFadnavis
#Chandrapur