चांदोरकर प्रतिष्ठान कडून आनंदघरला कॉम्प्युटर भेट Gift of computer to Anandghar from Chandorkar Pratishthan

चांदोरकर प्रतिष्ठान कडून आनंदघरला कॉम्प्युटर भेट

जळगांव : रोटरी क्लब जळगांव च्या ई-लर्निंग ऑनगोइंग प्रोजेक्ट अंतर्गत गरजू व उत्तम काम करणाऱ्या संस्थांना कॉम्प्युटर भेट देण्यात येतात. काल समता नगर येथील  वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी संचलित आनंदघर या शाळेसाठी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अंदाजे ३५० विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंट साठी रोटरी क्लबच्या माध्यमातून कंप्यूटर या शाळेस भेट देण्यात आला. अद्वैत दंडवते व प्रणाली दंडवते या पती पत्नीच्या अथक प्रयत्नातून आनंदघर ही शाळा उभी राहिली असून या संस्थेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात सुमारे ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जळगाव शहरात कचरा उचलणाऱ्या महिला व पुरुष यांच्या पाल्यांसाठी शिक्षणाचे अतिशय उत्तम असे कार्य या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. तेथील विद्यार्थी विद्यार्थिनींना कॉम्प्युटर चे शिक्षण मिळावे या हेतूने रोटरी क्लबने प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढाकार घेतला व चांदोरकर प्रतिष्ठानच्या सहकार्याने हा कॉम्प्युटर भेट दिला. 
या  प्रसंगी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर रोटरी क्लब चे अध्यक्ष सागर चित्रे सचिव पराग अग्रवाल आनंदघरच्या संचालिका प्रणाली दंडवते, डॉ. शुभदा कुलकर्णी कॅप्टन मोहन कुलकर्णी आनंदघरच्या शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते याप्रसंगी कॉम्प्युटर भेट दिल्यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल असे सांगताना प्रणाली दंडवते यांनी रोटरी क्लब जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.

Gift of computer to Anandghar from Chandorkar Pratishthan

#GiftofcomputertoAnandgharfromChandorkarPratishthan

#GiftOfcomputer 
#Anandghar 
#ChandorkarPratishthan
#JalgaonChandorkarPratishthan