चंद्रपुर जिल्ह्यातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी भक्कम पाऊल A strong step for the empowerment of women in Chandrapur district

चंद्रपुर जिल्ह्यातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी भक्कम पाऊल

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राच्या कामाची पाहणी


#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपूर, दि. 23: बल्लारपूर येथे साकारत असलेल्या स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास
केंद्राच्या उभारणीच्या कामाची पाहणी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. हे केंद्र 20 मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या केंद्रात वातानुकूलित बैठक हॉल्स, अत्याधुनिक वर्कशॉप, ई-लायब्ररी तसेच 100 महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या सुविधांसाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पाहणी दरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, मुकेश टांगले कार्यकारी अभियंता, भाजपाचे पदाधिकारी लखनसिंग चंदेल, , प्रज्ज्वलंत कडू, सुरज पेद्दूलवार, संजोग मेढे उपअभियंता, वैभव जोशी शाखा अभियंता, किशोर चीदरवार आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वातानुकूलित हॉलमध्ये इनबिल्ट माईक आणि पोडियम असावेत, अशा सूचना दिल्या. संपूर्ण केंद्रात सीसीटीव्ही सुरक्षा प्रणाली आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ यंत्र बसवावे. महिलांसाठी ई-लायब्ररी आणि वर्कशॉप सुविधा अधिक सक्षम करावी. अतिथी निवासाची व्यवस्था जागा उपलब्धतेनुसार करावी. केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. असे निर्देश दिले.

स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यासाठी स्व. सुषमा स्वराज यांच्या कुटुंबातील ॲड. बासुरी स्वराज यांना तसेच त्याच्या परिवारातील अन्य सदस्यांना विशेष निमंत्रण देण्याचे नियोजन करावे. बांधकामासाठी अतिरिक्त निधीची मागणी असल्यास नगर विकास विभागाकडून मागणी करण्यात येईल.  हे प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा भक्कम पाया ठरेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

A strong step for the empowerment of women in Chandrapur district

#AstrongstepfortheempowermentofwomeninChandrapurdistrict
#empowerment 
#women
#empowermentofwomen
#empowermentofwomeninChandrapurdistrict