उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा परिषद चंद्रपूर सीईओ जॉन्सन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव Zilla Parishad Chandrapur CEO Johnson felicitated by Chief Minister for excellent work

उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा परिषद चंद्रपूर सीईओ जॉन्सन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपूर, दि. 28 फेब्रुवारी : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत गौरव करण्यात आला. 
मुख्य कार्यकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. यात मिशन सक्षम, मिशन अंकुर, खुली विज्ञान बाग, स्टेम लॅब, ॲस्ट्रॅानॉमी लॅब, मोबाईल प्लॅनेटोरीयम, स्मार्ट पीएचसी, मोबाईल कॅन्सन व्हॅन, स्मार्ट वाचनालय, बचतगट मॉल, बळीराजा समृध्दी मार्ग अभियान, सोमनाथ कृषी पर्यटन, प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर आदी उपक्रमांचा समावेश आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल राज्य स्तरावर घेऊन 27 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री. जॉन्सन यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.  

#ZillaParishadChandrapurCEOJohnsonfelicitatedbyChiefMinisterforexcellentwork
#ZillaParishadChandrapur
#CEOJohnson
#felicitatedby
#चिएफमिनिस्टरफॉरएक्सेललेंटवर्क
#CMMaharashtra 
#ZillaParishadChandrapurCOJohnson