#Loktantra Ki Awaaz
जळगाव दि. ४ प्रतिनिधी - ‘सुरक्षा आणि स्वास्थ विकसित भारतासाठी आवश्यक’ ही प्रतिज्ञा घेऊन राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सुरवात जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये झाली. जैन फार्मफ्रेश फूडच्या जैन फुड पार्क, जैन व्हॅली, जैन एनर्जी पार्क, जैन अॅग्रीपार्क, प्लास्टिक पार्क यासह गांधी रिसर्च फाऊंडेशन, अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. दि. ०४ मार्च ते १० मार्च या काळात “राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह” पाळण्यात येणार आहे. आज सकाळी सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन सप्ताह सुरवात झाली.
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त सुरक्षा विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. निबंध स्पर्धा, सेफ्टी व्यंग चित्रकला स्पर्धा व सुरक्षितेसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण सप्ताहात सहकाऱ्यांना देण्यात येणारे आहे. यासाठी जैन फुड पार्क येथे झालेल्या जनजागृतीपर कार्यक्रमात जैन फार्मफ्रेश फूडस व जैन इरिगेशनचे सहकारी उपस्थीत होते. वरिष्ठ सहकारी सुनील गुप्ता, व्ही. पी. पाटील, जी. आर. पाटील, जी. आर. चौधरी, असलम देशपांडे, आर. डी. पाटील, वाय. जे. पाटील यांच्यासह पंकज लोहार, निखील भोळे, मनोज पाटील, नितीन चौधरी, हेमकांत पाटील, महेंद्र पाटील व सहकारी उपस्थित होते. सुरक्षा विभागाचे अधिकारी कैलास सैंदाणे यांनी सुरक्षितेविषयी जनजागृती करीत प्रतिज्ञा दिली.
प्लास्टीक पार्क येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरच्या लॉनवर सुरक्षा विभागाचे योगेश बाफना यांच्याकडून सहकाऱ्यांना सुरक्षा विषयीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची शपथ देण्यात आली. तसेच प्लांट आवारातील सहकाऱ्यांनी सुरक्षेविषयी शपथ घेतली.
दि. ४ मार्च १९६६ रोजी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना झाली, म्हणून दरवर्षी ४ मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. औद्योगिक तसेच व्यावसायिक ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्य विषयक सार्वजनिक जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. दैनंदिन काम करीत असताना जर आपण खबरदारी घेतल्यास किंवा जागरूकता दाखवल्यास होणारे अपघात टाळता येतात. विनाअपघात त्यात आपला जीवही सुरक्षित राहील आणि कंपनीचे होणारे नुकसानही टळेल. अशी माहिती दोघंही सुरक्षा अधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांना दिली.
54 National Safety Week observed at #JainIrrigation
#Systems
54 National Safety Week observed at Jain Irrigation Systems
# #JainIrrigationSystems
#Jainestablishments
#JalgaonJainairrigation