जलसंपदा विभागाच्या जलजागृती सप्ताह निमित्त बाईक रॅली संपन्न Bike rally concluded on the occasion of Water Awareness Week of Water Resources Department

जलसंपदा विभागाच्या जलजागृती सप्ताह निमित्त बाईक रॅली संपन्न

चंद्रपुर: जलसंपदा विभागाच्या द्वारा दरवर्षी १६ मार्च ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने या वर्षी पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग चंद्रपूर व त्या अंतर्गत असलेल्या उपविभागाद्वारे कार्यकारी अभियंता श्री. रविंद्रकुमार वऱ्हाडे व उपकार्यकारी अभियंता श्री. योगेश जामकर यांच्या नेतृत्वात जलबचावचे विविध उपक्रम राबविले गेले. कार्यालय परिसरात रांगोळी मधून जलबचाव चा सामाजिक संदेश देण्यात आला.यामध्ये कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपने सहभाग दर्शविला. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जटपुरा गेट ते गांधी चौक चंद्रपूर पर्यंत जलदिंडी काढून जल बचावचा सामाजिक संदेश दिला, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा बाबूपेठ चंद्रपूर येथे चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली.
तर सप्ताहाच्या शेवटी काल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भव्य बाईक रॅली काढण्यात आली .या रॅलीला श्री.सृजन अघम सहा.कार्य.अभियंता व लिना कन्नाके सहा.अभि.श्रेणी २ यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. या नंतर चंद्रपूर व ग्रामीण परिसरात जूनोना गावात जलजागृती करण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जल बचावाचे सामाजिक प्रबोधन केले.या वेळी उपस्थित गावचे सरपंच श्री. विवेक शेंडे यांनी जलसंपदा  विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून गावातील जल बचावचा उपक्रमाची माहिती दिली.या सर्व उपक्रमात वरिष्ट लिपिक तथा विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था नागपूर शाखा चंद्रपूरचे पालक संचालक गणेश गेडेकर,अभि. पूनम जीवतोडे, लीना कन्नाके, श्री.अतुल अत्रि विभागीय लेखाधिकारी ,प्रथम लिपिक अंजली वैरागडे, भांडारपाल अरुणा कोंडेकर, स्था.अभि.सहा.श्री. सूरज दुर्योधन, वरिष्ट लिपिक प्रकाश वानखेडे, प्रकाश राजूरकर, रामकिशोर उईके, परिक्षीत नकले, श्रीकांत गागापुरपू,कनिष्ठ लिपिक रेशमा राठोड, अक्षय खंते, अन्सार हुसेन, आदर्श कोठरवार, सोनाली किणेकर, गणेश लोखंडे, विवेक पराते व ईतर कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शविला.

Bike rally concluded on the occasion of Water Awareness Week of Water Resources Department