Chandrapur Anti Corruption Bureau Trap चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) व सरपंच यांचेविरूध्द अँटी करप्शन ब्युरो चंद्रपूरची कारवाई Chandrapur Anti Corruption Bureau Trap Action Against Gram Panchayat Officer (Gram Sevak) and Sarpanch of Chandrapur District

Chandrapur Anti Corruption Bureau Trap 

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) व सरपंच यांचेविरूध्द अँटी करप्शन ब्युरो चंद्रपूरची कारवाई

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपूर :तक्रारदार चंद्रपूर महानगर येथील रहिवासी असून त्यांनी मौजा अजयपूर येथे शेतजमीन खरेदी केलेली आहे. तक्रारदार यांना सदर शेतजमीनीचे फेरफार ग्रामपंचायतीमध्ये नोंद करणेकरिता आणि सदर शेतजमीनीवर व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात होता, परंतु त्यासाठी त्यांला लाच द्यावी लागते, असा धक्कादायक प्रकार चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर गावात घडला आहे. शेतजमिनीची फेरफार ग्रामपंचायतीत नोंदणी करण्यासाठी आणि कुक्कुटपालन व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंचाने 15 हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे. 

तक्रारदार चंद्रपूरमध्ये राहतात. त्यांनी अजयपूर येथे शेतजमीन खरेदी केली होती. त्यावर कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी 8 जानेवारीला ना हरकत प्रमाणपत्र आणि फेरफार नोंदणीसाठी अर्ज केला होता. 14 फेब्रुवारीला झालेल्या आमसभेत फेरफारचा विषय ठेवण्यात आला, तेव्हा सरपंच नलिनी तलांडे यांनी 10 हजार रुपये आणि ग्रामसेवक विकास तेलमासरे यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 1 मार्चला ACB कडे तक्रार केली. 4 आणि 5 मार्चला झालेल्या पडताळणीत सरपंच आणि ग्रामसेवक लाच घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले. 6 मार्चला ग्रामसेवक तेलमासरे यांना पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ 5 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तसेच, सरपंच तलांडे यांनी लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. 

पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान आणि अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, रमेश दुपारे, हिवराज नेवारे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, मेघा मोहूर्ले आणि सतीश सिडाम यांनी ही कारवाई यशस्वी केली.

Chandrapur Anti Corruption Bureau Trap 

 Anti Corruption Bureau Chandrapur Action Against Gram Panchayat Officer (Gram Sevak) and Sarpanch of Chandrapur District

#ChandrapurAntiCorruptionBureauTrap 
#AntiCorruptionBureauChandrapur #ActionAgainstGramPanchayat 
#ACB 
#Ajaypur 
#AjaypurGrampanchayat 
#AjaypurGramsevak 
#GramSevak 
#Sarpanch 
#Chandrapur District