चंद्रपूर महानगरपालिकांतील प्रशासक राजवटीविरोधात काँग्रेसचे आंदोलन Congress agitation against administrative rule in Chandrapur Municipal Corporation

चंद्रपूर महानगरपालिकांतील प्रशासक राजवटीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

#लोकतंत्र की आवाज 
चंद्रपूर: महानगरपालिकांमध्ये सुरू असलेल्या प्रशासक राजवटीविरोधात काँग्रेस शहर कमिटीच्या वतीने 4 मार्च रोजी कस्तुरबा चौकात आंदोलन करण्यात आले. मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची निवड न होता प्रशासकांमार्फत प्रशासन चालवले जात आहे. यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता घसरली असून, नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.

काँग्रेस शहर कमिटीच्या वतीने आयोजित या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले, तर माजी आमदार व काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, महिला कमिटीचे शहर अध्यक्ष चंदा वैरागडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक  सुनीता लोढिया, माजी नगरसेवक नंदू नगरकर, माजी नगराध्यक्ष सुरेश महाकूलकर, दिनेश चौखारे, पप्पू देशमुख, मनीष तिवारी, अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर खोबरागडे, अश्विनी खोब्रागडे, अनुश्री देहगावकर, साकीना अन्सारी, ललित रेवल्लीवार, राजेश  रेवल्लीवार, प्रशांत दानव, मनोरंजन रॉय, खुशबू चोधरी, नरेंद्र बोबडे, भालचंद्र दानव, नीलेश ठाकरे, खुशबू चौधरी, कुणाल चहारे, शिरीष गोगुलवार, राहुल चौधरी, अनिल नरुले, विजय पोहनकर, रतन शिलावार, शालिनी भगत, रामकृष्ण कोंड्रा, बापू अंसारी, शोभाताई वाघमारे, दुर्गेश कोडाम, अली अमजद, राजू वासेकर, पप्पू सिद्धीकी, नवशाद शेख, जावेद शेख, दौलत चालखुरे, अजय बल्की, अजय महाडोरे, युसुफ चाचा, गौस खान, गुंजन येरणे आदींसह काँग्रेसच्या युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, एन.एस.यु.आय., इंटक आदी विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

- जनविकास सेनेचे समर्थन
प्रशासक राजवटीच्या निष्क्रियतेला वाचा फोडण्यासाठी शहर काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होत जनविकास सेनेने संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी समर्थन दिले.

Congress agitation against administrative rule in Chandrapur Municipal Corporation

#Congressagitationagainstadministration 
#CongressagitationagainstadministrativeruleinChandrapurMunicipalCorporation 
#ChandrapurMunicipalCorporation 
#cmc 
#cmcChandrapur 
#Congress