गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशन बल्लारपूर तर्फे मोफत करिअर मार्गदर्शन व गुणवंतांचा सत्कार संपन्न Guru Nanak College Global Foundation Ballarpur provides free career guidance and felicitation of meritorious students


गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशन बल्लारपूर तर्फे मोफत करिअर मार्गदर्शन व गुणवंतांचा सत्कार संपन्न

#Loktantra Ki Awaaz
बल्लारपूर, 26 ऑगस्ट : गुरुनानक कॉलेज बल्लारपूरचे माजी विद्यार्थी यांच्या संघटनेतर्फे स्थापन करण्यात आलेल्या गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशन बल्लारपूर तर्फे मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा काल सोमवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता बल्लारपूर येथील राजे बल्लाळशाह नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री. हरीश बुटले (संस्थापक सचिव डीपर, संस्थापक अध्यक्ष साद फाउंडेशन पुणे प्रमुख) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीचे महत्त्व, बारावी विज्ञान शाखेनंतर उपलब्ध असलेल्या विविध संधी तसेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य व तयारी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा शेकडो विद्यार्थ्यांनी मोठा लाभ घेतला.

कार्यक्रमाला गुरु नानक कॉलेज ऑफ सायन्स बल्लारपूरचे प्राचार्य प्रा. बहिरवार सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात गुरुनानक कॉलेज ऑफ सायन्स बल्लारपूर चे यंदाच्या शैक्षणिक वर्षातील एच.एस.सी., बी.एस्सी. आणि एम.एस्सी. टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

🔶 गुणवंत विद्यार्थी

एच.एस.सी. टॉपर विद्यार्थी :
प्रथम : पियुष लालवाणी
द्वितीय : आदित्य फुलझेले
तृतीय : आन्या चंदेल

बी.एस्सी. टॉपर विद्यार्थी :
प्रथम : वैष्णवी राजुरकर
द्वितीय : तोशिबा कैथवास
तृतीय : आयुष मामीडवार

एम.एस्सी. टॉपर विद्यार्थी :
प्रथम : राशी शिंगाडे
द्वितीय : ओंकार महंतो

यावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव शेअर करताना मेहनत, सातत्य आणि वेळेचे नियोजन हेच यशाचे रहस्य असल्याचे सांगितले. आयोजकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशन बल्लारपुरचे अध्यक्ष डॉ. विजय वाढई, सचिव नरेश मुंदडा, उपाध्यक्ष विरेंद्र आर्य, सहसचिव जितेंद्र जोगड, कोषाध्यक्ष डॉ. प्रफुल काटकर, तसेच कार्तिक वागदेव, युवराज बोबडे सर, अमोल गर्गेलवार, मनीषा जीवतोड़े, विजय दिकोंडावार, डॉ. शितल जांभूले, करुणा देवगडे, प्रणय विग्नेशवर यांच्या पुढाकाराने झाले.

👉🏻 या कार्यक्रमाला विविध नामांकित संस्थांचे सहकार्य लाभले.
1. बी. आय. टि. कॉलेज, बल्लारपूर
2. चंद्रपूर कॉलेज ऑफ फार्मसी, चंद्रपूर
3. गुरुनानक कॉलेज ऑफ सायन्स, बल्लारपूर
4. माउंट ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर
5. एज्युकेशन पॉईंट, बल्लारपूर
6. के. जी. एन. पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर
7. अडीटेक बायोटेक प्रा. लि.

या सर्व संस्थांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठीचा हा मार्गदर्शन सोहळा भव्य व यशस्वीरीत्या संपन्न झाला. आयोजकांनी सर्व स्पॉन्सर संस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.

👉🏻 या कार्यक्रमाच्या यशात स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा होता.
सानिका वंधारे, श्रेष्ठा डांगे, ओमकार कवठे, सुजल नागराळे, नौशिना शेख, श्रेया सालवे, या सर्व विद्यार्थी स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम सुरळीत व यशस्वी पार पडला. आयोजक मंडळाने त्यांचे विशेष कौतुक करून आभार मानले. कार्यक्रम चे संचालन नरेश मुंदडा यांनी व आभार प्रदर्शन विरेंद्र आर्य यांनी केले.

Guru Nanak College Global Foundation Ballarpur provides free career guidance and felicitation of meritorious students 

#GuruNanakCollegeGlobalFoundationBallarpurprovidesfreecareerguidanceandfelicitationofmeritoriousstudents 
#GNC 
#GNCGF 
#GuruNanakcollege 
#GNCBallarpur 
#DEEPER 
#Deeperpune