#Loktantra Ki Awaaz
चंद्रपुर : पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग क्र. २ चंद्रपूर तसेच पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग आलापल्ली मु.चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने कार्यालय परिसरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला. वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात कार्यकारी अभियंता रविंद्र वऱ्हाडे व उपकार्यकारी अभियंता योगेश जामकर यांचे हस्ते करण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षाचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमासाठी विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे पालक संचालक तथा वरिष्ट लिपिक गणेश गेडेकर, प्रथम लिपिक अंजली वैरागडे, सहा.अभियंता कु. पूनम जीवतोडे, लीना कन्नाके, विभागीय भांडारपाल अरुणा कोंडेकर, प्रकाश वानखेडे, सिद्धेश्वर दंडिकवार, रेशमा राठोड, अन्सार हुसेन तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Irrigation Project Investigation Department completes tree plantation program at Chandrapur
