💥 १० लाख रुपयांची लाच घेताना अटक
जालना : जालना नगर परिषदेचे रुपांतर महानगर पालिकेत नुकतेच करण्यात आले आहे. या महापालिकेचा कारभार ही सुरू झाला आहे. मात्र याच महापालिकेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महापालिकेच्या आयुक्तांनीच लाच घेतानाच लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या दालनातच ही लाच घेत असल्याचं आढळून आलं आहे. त्यानंतर आयुक्तांना ताब्यात घेवून चौकशीसाठी घेवून गेले आहेत. त्यामुळे चौकशीत आणखी काही बाहेर येते का हे पाहवं लागणार आहे. चौकशीनंतरच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार असल्याचं ही सांगितलं जात आहे.
संतोष खांडेकर हे जालना महापालिकेचे आयुक्त आहेत. जालना नगर परिषदेत ही त्यांनी मुख्यधिकारी म्हणून काम पाहीले आहे. प्रमोशनवर ते परत जालना महापालिका झाल्यानंतर आयुक्त म्हणून आले आहेत. जालना महापालिकेच्या इमारतीचे सध्या काम सुरू आहे. ते एका एका ठेकेदाराला देण्यासाठी त्यांनी एक कोटींची लाच मागितल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या लाचेचा पहिला हाफ्ता म्हणून 10 लाख रूपये देण्याचं निश्चित झालं होतं.
त्यानुसार हा पहिला दहा लाखांचा हाफ्ता घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. लाच लुचपत विभागाचा दुसऱ्या पथकाकडून आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली जात आहे. आयुक्त संतोष खांडेकर यांनी महानगरपालिका गुत्तेदाराकडून दहा लाखाची लाचेची मागणी केल्या प्रकरणी, जालना महानगरपालिकेच्या दालनातूनच लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले गेले. या प्रकरणी अधिक तपास लाचलुचपत विभागाचे पथक करत आहे.
महापालिकेच्या आयुक्तांनाच लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. संध्याकाळी आठ वाजताच्या सुमार ही घटना घडली आहे. तेव्हा पासून लाच लुचपत विभागाचे पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. शिवाय त्यांच्या निवासस्थानाचीही झडती घेतली जात असल्याचं समोर आलं आहे. नव्यानेच झालेल्या या महापालिकेत घडलेल्या या प्रकाराने सर्वच जण हादरले आहेत.
#ACB
#ACBJalna
#AyuktJalnaPalika
