चंद्रपुरात लाच घेताना मुद्रांक पेपर्स विक्रेत्याला अटक, चंद्रपुर ACB ची कार्रवाई Stamp paper seller arrested while taking bribe in Chandrapur, Action by Chandrapur ACB

💥चंद्रपुरात लाच घेताना मुद्रांक पेपर्स विक्रेत्याला अटक

💥चंद्रपुर ACB ची कार्रवाई

#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर: चंद्रपूर महानगरातील मुद्रांक विक्रेता व मदतनीस यांना 140 रुपयांची लाच घेताना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. काल 31 ऑक्टोबर रोजी चंद्रपुर जलनगर वॉर्डातील मुद्रांक विक्रेता मनीष अरुण देशमुख व मदतनीस रुपाली भरतलाल चौधरी यांनी वीज टेंडर कामाकरिता तक्रारकर्त्याला 140 रुपये अतिरिक्त मागितले होते.

तक्रारदार हे चंद्रपुरातील रहिवासी असून त्यांना वीज टेंडरच्या कामासाठी 500 रुपयांचे 3 स्टॅम्प पेपर व 100 रुपयांचे 5 स्टॅम्प (मुद्रांक पेपर) हवे होते, मुद्रांक विक्रेत्याने 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अतिरिक्त 30 रुपये असे एकूण 90 रुपये तर 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर अतिरिक्त 10 रुपये असे 50 रुपये एकूण 140 रुपये मागितले, तक्रारदाराने मागितलेल्या स्टॅम्प पेपर ची शासकीय किंमत 2 हजार रुपये होती त्यावर अतिरिक्त 140 असे एकूण 2 हजार 140 रुपयांची मागणी केली, अतिरिक्त पैसे न दिल्यास स्टॅम्प पेपर मिळणार नाही अशी भूमिका मुद्रांक विक्रेता मनीष देशमुख यांनी घेतली होती.

तक्रारदाराला अतिरिक्त पैसे म्हणजेच लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत तक्रार दिली, लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करीत सापळा रचला असता काल 31ऑक्टोबर ला शासकीय शुल्क व्यतिरिक्त 140 रुपयांची लाच मुद्रांक विक्रेता मनीष देशमुख यांनी स्वीकारत ती मदतनीस रुपाली भरतलाल चौधरी यांच्याकडे देत असताना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. यावेळी मुद्रांक विक्रेता देशमुख व मदतनीस चौधरी यांना पुढील तपासकामी अटक करण्यात आली. 

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश उरकुडे, पोलीस कर्मचारी अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, राजेंद्र चौधरी, पुष्पा काचोळे व सतीश सिडाम यांनी केली.

💥 Stamp paper seller arrested while taking bribe in Chandrapur

💥Action by Chandrapur ACB

#StamppapersellerarrestedwhiletakingbribeinChandrapur
#ActionbyChandrapurACB
#ChandrapurACB
#Chandrapur 
#ACB