गोवंश तस्करी रोखण्यासाठी चंद्रपुर पोलीस प्रशासनाचे कडक पाऊल, ‘मकोका’ सह कठोर कारवाईचा इशारा Chandrapur Police Administration takes strict steps to prevent cattle smuggling, warns of strict action including MCOCA

🔶 गोवंश तस्करी रोखण्यासाठी चंद्रपुर पोलीस प्रशासनाचे कडक पाऊल

🔶 ‘मकोका’ सह कठोर कारवाईचा इशारा

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपुर, 23 मे : चंद्रपुर जिल्ह्यात वाढत्या अवैध गो-वंश तस्करी, कत्तल आणि मुक्या जनावरांवरील क्रूरतेला आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी मोठी आणि कठोर मोहीम हाती घेतली आहे. पोलीस मुख्यालयातील ‘ड्रिल शेड’ येथे आज दुपारी आयोजित विशेष “ओळख परेड व प्रतिबंधात्मक कारवाई कॅम्प” मध्ये जिल्ह्यातील तब्बल २९३ हजर सराईत गो-तस्करांची नोंद घेऊन त्यांना कडक इशारा देण्यात आला.
ही मोहीम चंद्रपुर जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकड़े यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक कायंदे पाटील (IPS), सचिन खेत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक अमोल काचोरे तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, चंद्रपूर, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, मूल, राजुरा आणि गडचांदूर या सर्व उपविभागांतील गो-तस्करीशी संबंधित गुन्हेगारांची संपूर्ण माहिती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड पोलिसांकडे उपलब्ध आहे. यापुढे अवैध जनावर वाहतुकीच्या गुन्ह्यांमध्ये केवळ साधी कलमे न लावता संघटित गुन्हेगारी अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
👉🏻 ‘मकोका’चा थेट इशारा
पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अवैध गो-तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर आता थेट Maharashtra Control of Organised Crime Act अर्थात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली जाईल. अशा गुन्ह्यांमध्ये जामीन मिळणे कठीण होणार असून आरोपींना दीर्घकाळ तुरुंगात राहावे लागू शकते.
👉🏻 मालमत्ता व वाहने जप्त होणार
तस्करीतून मिळवलेली संपत्ती कायद्यानुसार जप्त करण्यात येणार असून, अवैध वाहतुकीसाठी वापरलेली वाहने न्यायालयीन प्रक्रियेनंतर थेट सरकार जमा करण्यात येतील, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
👉🏻 नागरिकांना सहकार्याचे आवाहन
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, “चंद्रपूर जिल्हा पोलीस गो-तस्करीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहेत. कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल.”
या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील गो-तस्करीविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Chandrapur Police Administration takes strict steps to prevent cattle smuggling, warns of strict action including MCOCA 
#ChandrapurPoliceAdministrationtakesstrictstepstopreventcattlesmuggling 
#warnsofstrictactionIncludingMCOCA
#ChandrapurPoliceAdministration 
#prevent 
#cattle
#smuggling 
#warns 
#strictaction 
#MCOCA
#ChandrapurPolice
#Administration