"महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन, "भारतीय जैन संघटना (बीजेएस) च्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या विनामूल्य शैक्षणिक पुनर्वसन "Educational rehabilitation of students from suicide-affected farmer families in Maharashtra"Free educational rehabilitation of boys and girls from suicide-affected farmer families on behalf of the Bharatiya Jain Sanghatana (BJS)

✍🏻 "महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन"

✍🏻 भारतीय जैन संघटना (बीजेएस) च्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या विनामूल्य शैक्षणिक पुनर्वसन

#Loktantra Ki Awaaz
चंद्रपुर, 22 मे : भारतीय जैन संघटना (बीजेएस) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील उपक्रम संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा याच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रवेश देऊन त्यांचे शिक्षण, निवास, भोजन, ड्रेस, शैक्षणिक साहित्य तसेच इतर आवश्यक सुविधा पूर्णतः विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मागील दोन वर्षांत आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील इयत्ता पाचवी, सहावी व सातवीमध्ये आता प्रवेश घेत असलेल्या मुला-मुलींना या प्रकल्पात प्रवेश देण्यात येणार असून त्यांचे बारावी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण भारतीय जैन संघटनेमार्फत विनामूल्य करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पात्र विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त करण्यात आली आहे. भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सेवक संबंधित कुटुंबांच्या घरी गावातील सरपंच किंवा प्रतिष्ठीत व्यक्ती सोबत घेऊन जाऊन प्रत्यक्ष भेट घेणार असून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या योजनेची सविस्तर माहिती व्हिडिओ व छायाचित्रांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात येणार आहे.

घरातील कर्ता शेतकरी आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण कुटुंब मानसिक, सामाजिक व आर्थिक संकटात सापडलेला असतो, अशा कठीण परिस्थितीतही मुला-मुलींचे शिक्षण थांबता कामा नये, त्यांनी शिक्षण घेऊन भविष्यात स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे उचलली पाहिजे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा यांनी सांगितले. इच्छुक व गरजू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनी या शैक्षणिक पुनर्वसन उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आपल्या गावात असे कोणी कुटुंब असेल तर त्यांनी चंद्रपुर जिल्ह्या साठी राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा 9822366601, चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष द्विपेद्र पारख मोबाईल नम्बर  94221 81369 यांच्याशी संपर्क साधावा.

"Educational rehabilitation of students from suicide-affected farmer families in Maharashtra"

Free educational rehabilitation of boys and girls from suicide-affected farmer families on behalf of the Bharatiya Jain Sanghatana (BJS)

#EducationalRehabilitationOfStudentsFromSuicide-affectedfarmerfamiliesinMaharashtra"
#FreeeducationalrehabilitationofboysandgirlsfromSuicide-affectedfarmerfamiliesonBehalfoftheBharatiyaJainSanghatana 
#BJS 
#FreeeducationalrehabilitationofboysandgirlsfromSuicide-affectedfarmerfamiliesonBehalfofthe  #BharatiyaJainSanghatana
#BharatiyaJainSanghatana