💊 कालबाह्य (Expired) गोळ्या दिल्यामुळे मेडिकलवर कारवाई
#Loktantra Ki Awaaz
नांदेड़, 15 जुन : वडिलांसाठी आणलेल्या औषधांमध्ये कालबाह्य (Expired) गोळ्या दिल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी जागरूक ग्राहकाने थेट अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार नोंदवली. या तक्रारीची गंभीर दखल घेत आयुक्त मुंढेंच्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने आज (15 जून 2026) दुपारी नांदेड येथील 'तोष्णीवाल मेडिकल'वर धडक कारवाई करत दुकान तात्काळ सील केले आहे. तुकाराम मुंढे यांच्या या तत्पर आणि धडक कारवाईमुळे नांदेड़ जिल्ह्यातील अवैध व निष्काळजीपणे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेकांवर कारवाई करत गुन्हे देखील दाखल केले जात आहेत. त्यांच्या या तत्परतेचा अनुभव आज नांदेडकरांना मिळाला. डॉक्टर लेन भागातील एका मेडिकल चालकाने ग्राहकाला चक्क डायबिटीसच्या नियमबाह्य झालेल्या गोळ्यांची विक्री केली. नियमबाह्य गोळ्या असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ग्राहकाने थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांना ई-मेल (Email) केला. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी तत्परता दाखवत नांदेडच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांनी मेडिकल चालकाला नियमबाह्य झालेल्या गोळ्या विक्री करतांना पडकलं. या कारवाईने मेडिकल चालकांचं धाबे दणाणले.
👉🏻 नेमकं विषय काय आहे, ते सविस्तार बघा ?
या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हनुमंत वनाळेकर हे आपल्या 90 वर्षीय वडिलांसाठी डायबिटीसच्या गोळ्या घेण्यासाठी शनिवारी डॉक्टर लेन, नांदेड़ येथे पोहोचले. नांदेड़ येथील तोष्णीवाल मेडिकलवरून त्यांनी डायबिटीज च्या डायिटीस गोळ्यांचे तीन पाकिटे खरेदी केले. घरी गेल्यानंतर हनुमंत वनाळेकर यांच्या मुलीला गोळ्यांची मुदत डिसेंबर 2025 रोजी संपल्याचं निदर्शनास आलं. ही बाब समजल्यानंतर मुलगा हनुमंत वनाळेकर यांनी थेट FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांना मेल केला आणि तोष्णीवाल मेडिकल नांदेड़ कडून डायबिटीसच्या मुदतबाह्य गोळ्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार केली.
👉🏻 FDA ने मेडिकल चालकाला रंगेहाथ पकडलं
तक्रार प्राप्त होताच आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर आज संबंधित तक्रारदाराने पुन्हा मेडिकलवर जाऊन डायबिटिसच्या गोळ्या खरेदी केल्या. मुदतबाह्य गोळ्या विक्री करत असताना अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अशोक राठोड यांनी मेडिकल चालकाला पकडलं. अन्न आणि औषध प्रशासनाकडून दोन तास चौकशी करून गोळ्या जप्त केल्या. शिवाय मेडिकल बंद ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, तोष्णीवाल मेडिकल हे नांदेड़ शहरातील होलसेल मेडिकल म्हणून ओळखले जाते. सर्व प्रकाराच्या गोळ्या येथे विक्री केल्या जातात. मुदतबाह्य गोळ्या आढळून आल्यानं तसेच अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे नांदेड़ शहरात खळबळ उडाली आहे.
👉🏻 मेडिकल चालक चे बंधु अनिल तोष्णीवाल काय म्हणाले?
'आता आमच्याकडे आलेले जे ग्राहक आहेत. ते गेल्या 10 वर्षांपासून माझे ग्राहक आहेत. यावेळी चुकून कोणीतरी मुदतबाह्य गोळ्या आम्हाला आणून दिलेल्या आहेत. त्या गोळ्या आमच्याकडे मुदतबाह्य औषधांमध्ये ठेवल्या जातील. आम्ही या गोळ्या होलसेलरला परत करत असतो. परंतु तीन महिन्यापेक्षा जास्त असेल तर तो घेत नाही. त्याच्यामुळे ती चुकून राहिली होती. नजरचुकीने ते सारखे दोन डब्बे आजूबाजूला असल्यामुळे, ते चुकून देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही त्यांची माफी मागतो, आणि अशी चूक पुन्हा होणार नाही. कारण मला देखील मेडिकल सुरु करुन 40 वर्ष झाले आहेत. नांदेड शहरामध्ये कुठे काही मिळत नाही, ते तोष्णीवाल मेडिकलमध्ये मिळतं. त्यामुळे आम्ही आमचं काम व्यवस्थित करु, 100 टक्के रुग्णाची काळजी घेऊ', असं मेडिकलचालक किरण तोष्णीवाल यांचे लहान बंधू अनिल तोष्णीवाल यांनी म्हटलं आहे.
Commissioner Tukaram Mundhe's direct rebuke after patient's email complaint! Action taken against medical practitioner for giving expired pills
#FDA
#CommissionerTukaramMunde
#MedicalNanded
#FDAActionMedicalNanded
#Medicine
#ExpiredPills
