शेगांवमधील प्रसिद्ध शेगांव कचोरी सेंटरवर 'एफडीए'चा छापा FDA raids famous Shegaon Kachori Center in Shegaon.

शेगांवमधील प्रसिद्ध शेगांव कचोरी सेंटरवर 'एफडीए'चा छापा

#Loktantra Ki Awaaz 
बुलढाणा : शेगांव येथील प्रसिद्ध शेगांव कचोरी (#Shegaon-Kachori) सेंटरवर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकल्याची माहिती आहे. कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाने घेतले आहेत. भेसळ युक्त पदार्थ आढळल्यास अन्न आणि औषध प्रशासन निश्चितपणे कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेगांव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकून या कचोरी सेंटर वरील कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासनीसाठी घेतले.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार शेगांव येथील कचोरी ही प्रसिद्ध आहे व शेगांव येथे आल्यानंतर लाखो भाविक ही कचोरी खातात. मात्र ही कचोरी कशी बनवल्या जाते, त्यासाठी कोणता कच्चामाल वापरला जातो? हे तपासण्यासाठी काल (गुरूवारी, ता ११) सायंकाळी अचानक अन्न व औषधी प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वात अचानक छापा टाकून कचोरी बनवण्यासाठीचे साहित्य व त्याचे नमुने घेण्यात आले, तपासणीनंतर या नमुन्यात जर भेसळ आढळून आली. तर शेगांव कचोरी सेंटरवर कारवाई करण्यात येईल असंही अन्न आणि औषध प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

FDA raids famous Shegaon Kachori Center in Shegaon.

#FDAraidsFamousShegaonKachoriCenterinShegaon 
#FDAraids 
#ShegaonKachori 
#Shegaon 
#FDA