FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांचा धडाका! कृत्रिमरीत्या पिकवलेले ११ लाखांचे आंबे जप्त, ठाण्यात FDAची मोठी कारवाई Tukaram Munde's blast! Artificially grown mangoes worth Rs 11 lakh seized, FDA's big action in Thane

🚨 FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांचा धडाका! 

🥭 कृत्रिमरीत्या पिकवलेले ११ लाखांचे आंबे जप्त 
 🥭 ठाण्यात FDAची मोठी कारवाई 

#Loktantra Ki Awaaz 
ठाणे, 2 जून : अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्नसुरक्षेसाठी धडक मोहिमा सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ३० आणि ३१ मे रोजी ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह विविध ठिकाणी छापेमारी करत मोठी कारवाई केली.
🔹 ३,४५३ किलो आंबे जप्त 
🔹 जप्त आंब्यांची किंमत – ₹११,१२,८५०/- 
🔹 नियमबाह्य पद्धतीने आंबे पिकवण्याचा प्रकार उघड 
🔹 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले
तपासादरम्यान काही व्यापारी आंबे लवकर पिकवण्यासाठी इथिलिनसदृश्य स्प्रेचा थेट वापर करत असल्याचे आढळून आले. एफएसएसएआय (FSSAI) च्या नियमांनुसार फळांवर थेट इथिलिन स्प्रे मारणे बेकायदेशीर असून, फळे पिकवण्यासाठी केवळ इथिलिन गॅस चेंबरचा वापर करण्यास परवानगी आहे.
या प्रकरणात तीन मोठ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित व्यापाऱ्यांविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.